Punjab Police Dainik Gomantak
देश

पंजाब पोलिसांना मिळाली लॉरेन्स बिश्नोईची ट्रान्झिट रिमांड

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी तपास करत असलेल्या पंजाब पोलिसांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी तपास करत असलेल्या पंजाब पोलिसांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मंगळवारी पंजाब पोलिसांना लॉरेन्सला अटक करण्याची परवानगी दिली आहे. एक दिवसाची ट्रान्झिट रिमांडही मंजूर केली आहे. पंजाब पोलीस बुधवारी मानसा न्यायालयात लॉरेन्स बिश्नोईला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करणार आहेत. (sidhu moosewala murder case punjab police gets gangster lawrence bishnoi transit remand)

दरम्यान, न्यायालयाने पंजाब (Punjab) पोलिसांना दिल्ली सोडण्यापूर्वी आणि पंजाबच्या संबंधित सीजेएम न्यायालयात हजर करण्यापूर्वी कायद्यानुसार/नियमांनुसार आरोपीची वैद्यकीय तपासणी केली जाईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात 29 मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, ज्यांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे.

दुसरीकडे, पटियाला हाऊस कोर्टाने मुसेवाला खून प्रकरणातील आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या ट्रान्झिट रिमांडसाठी पंजाब पोलिसांच्या (Police) याचिकेवर आदल्या दिवशी निर्णय राखून ठेवला होता.

तसेच, पंजाब पोलिसांनी आज न्यायालयात युक्तिवाद केला की, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई आहे. त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे.

लॉरेन्स बिश्नोईचे वकील विशाल चोप्रा यांनी सांगितले की, 'कोर्टाने अटींसह ट्रान्झिट रिमांड दिला आहे. लॉरेन्सला नेण्याआधी पंजाब पोलीस त्याची वैद्यकीय चाचणी करतील. सुरक्षेच्या सर्व उपायांची काळजी घेतली जाईल. त्याला हातकड्या घातल्या जातील.'

विशाल चोप्राने पुढे सांगितले की, यासोबतच लॉरेन्सला कोर्टात नेण्यापासून संपूर्ण व्हिडिओग्राफी केली जाईल. त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पंजाब पोलिसांची असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मंत्रिमंडळातील रिक्त जागी मुख्‍यमंत्री सावंत कुणाची वर्णी लावणार? संपूर्ण राज्‍याचे लक्ष; मायकल संकल्‍प यांच्‍या आशा पल्लवित

'या गुन्ह्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण झालीय, जेनिटोला जामीन देऊ नका'; 'रामा'ची ठाम भूमिका

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Unity Mall Goa Controversy: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी

SCROLL FOR NEXT