Sidhu Moose Wala Dainik Gomantak
देश

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई 'मास्टरमाईंड'

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

Sidhu Moose Wala Case: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. मानसामध्ये 29 मे रोजी सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारने घेतली होती. जो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी आहे. गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुसेवालावर 19 गोळ्या झाडण्यात आल्या आणि अवघ्या 15 मिनिटांत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मुसेवालाच्या शरीराच्या उजव्या भागाला बहुतांश गोळ्या लागल्या. किडनी, यकृत, फुफ्फुस आणि पाठीच्या कण्यालाही गोळ्या लागल्या आहेत. मृत्यूचे कारण रक्तस्त्राव शॉक असल्याचे सांगितले जात आहे. सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) खून प्रकरणात गुन्हेगारांना रसद पुरवणे, शोध घेणे आणि शूटर्सना आश्रय दिल्याबद्दल पोलिसांनी आतापर्यंत किमान आठ जणांना अटक केली आहे.

तसेच, पंजाबी गायक सिध्दु मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब (Punjab) पोलिसांनी लॉजिस्टिक सपोर्ट, रेकी करणे आणि शार्प शुटरला आश्रय दिल्याबद्दल किमान आठ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप ऊर्फ केकरा (सिरसा, हरियाणा), मनप्रीत सिंग ऊर्फ मन्नू झातलवंडी साबो (भटिंडा), मनप्रीत भाऊ (फरीदकोट), सराज मिंटू (अमृतसर), प्रभू दीप सिद्धू ऊर्फ पब्बी (हरियाणा तख्त माल), मोनू डागर (रेवाडी) यांचा समावेश आहे. पवन बिश्नोई आणि नसीब फतेहाबाद हरियाणाचे (Haryana) रहिवासी असल्याचे सांगितले जाते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT