Siddaramaiah- DK Shivakumar Planning To Bring Back BJP MLAs To Congress :
कर्नाटकमध्ये तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला. या निवडणुकीपूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता राज्यातील राजकीय समीकरण बदलले असून, हे नेते काँग्रेसमध्ये घरवापसी करू शकतात, अशी चर्चा आहे.
अशात कर्नाकटचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष असलेले शिवकुमार यांच्याशी काँग्रेसमध्ये परत येण्याबाबत भाजपच्या या आमदारांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून यासाठी योजना आखत आहेत.
भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अशा शक्यता नाकारल्या आहेत. 'भाजपचे सर्व आमदार आमच्यासोबत राहतील, पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत', असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, 'मी राज्याचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे अनेक नेते मला भेटायला यायचे, त्यामुळे भाजपचा एखादा आमदार काँग्रेसच्या नेत्याला भेटला तर त्याचा काँग्रेसमध्ये जाण्याचा संबंध जोडू नये.'
सध्या अनेक काँग्रेस नेते कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सांगत आहेत की, येत्या काही दिवसांत भाजपचे चार-पाच आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. काँग्रेसचे माजी नेते आणि एसटी सोमशेकर हे भाजप सोडणारे बहुधा पहिलेच व्यक्ती असतील, असे सूत्रांकडून समजते.
घरवापसीच्या तयारीत असलेले हे तेच आमदार आहेत ज्यांनी 2019 मध्ये एचडी कुमार स्वामी यांचे काँग्रेसचे आघाडी सरकार पाडले होते. 2019 मध्ये, 14 काँग्रेस आमदार आणि तीन जेडीयू (एस) आमदारांनी एनडीएमध्ये सामील होत सरकार पाडले होते.
भाजप आमदार एसटी सोमशेखर यांनी गुरुवारी (17 ऑगस्ट 2023) एका कार्यक्रमात डीके शिवकुमार यांचे मोकळेपणाने कौतुक केले होते.
डीके शिवकुमार हे माझे राजकीय गुरू असल्याचे ते म्हणाले होते. माझ्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी मला खूप मदत केली.
यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे भाजप आमदार कॉंग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, असे बोलले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आमदारांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष असलेले शिवकुमार यांच्याशी काँग्रेसमध्ये परत येण्याबाबत चर्चा केली आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की, काँग्रेसमध्ये परतण्यास इच्छुक असलेल्यांनी यापूर्वी पक्षासाठी काम केले होते.
“मी केपीसीसी अध्यक्ष असताना सोमशेकर (बेंगळुरू ग्रामीण) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. ते तीन वेळा आमदार होते आणि त्यांनी पक्षात कायम राहिले असते तर ते मंत्री झाले असते,” पक्षाचे सदस्य त्यांच्या पुनरागमनाला विरोध करणार नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.