Shubman Gill  Dainik Gomantak
देश

IND vs ENG: शुभमन गिलचा डबल धमाका! 59 वर्ष जुना रेकॉर्ड मोडून रचला इतिहास; टीम इंडियाचा 'प्रिन्स' बुलेट ट्रेनसारखा सुस्साट

Shubman Gill Record: ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने इतिहास रचला.

Manish Jadhav

Shubman Gill Record: ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने इतिहास रचला. आता तो कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनला. या बाबतीत त्याने सुनील गावस्कर यांना मागे सोडले. हा विक्रम मोडण्यासाठी गिलला फक्त 11 धावा करायच्या होत्या. या सामन्यात त्याने 11 धावा करताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. एवढेच नाहीतर त्याने पहिली रन काढताच 59 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला.

गिलने गॅरी सोबर्सचा विक्रम मोडला

दरम्यान, भारतीय संघाने नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. भारताने 38 धावांवर केएल राहुलच्या (KL Rahul) रुपाने दुसरी विकेट गमावल्यानंतर कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात आला. गिलने आपल्या डावातील सहाव्या चेंडूवर खाते उघडताच, या कसोटी मालिकेत त्याच्या एकूण धावा 723 झाल्या.

यासोबतच तो सेना (SENA - South Africa, England, New Zealand, Australia) देशांमध्ये कर्णधार म्हणून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. यापूर्वी, हा विक्रम वेस्ट इंडिजचे महान खेळाडू गॅरी सोबर्स यांच्या नावावर होता. सोबर्स यांनी 1966 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर कर्णधार म्हणून 722 धावा केल्या होत्या. गिलने सोबर्स यांचा 59 वर्ष जुना विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला.

सुनील गावस्कर यांचाही विक्रम ध्वस्त

ओव्हल कसोटी सामन्यात शुभमन गिलने आणखी एक मोठी कामगिरी केली. तो आता भारतासाठी एका कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. गिलने याबाबतीत भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा विक्रम मोडीत काढला. गावस्कर यांनी 1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून एकूण 732 धावा केल्या होत्या. आता या यादीत शुभमन गिल अव्वल स्थानी पोहोचला.

गिलच्या या अप्रतिम कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय लिहिला गेला असून, त्याच्या नेतृत्वाखाली भविष्यातील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT