Shraddha Walker  Dainik Gomantak
देश

Shraddha Walker Case: आरोपी आफताबने जामीन अर्ज घेतला मागे, जाणून घ्या कारण

Shraddha Walker Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याने दिल्ली न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Shraddha Walker Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याने दिल्ली न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. आफताब आणि त्याचे वकील यांच्यात गैरसमज झाल्याने जामीन अर्ज मागे घेण्यात आला. आफताबचे वकील एमएस खान यांनी कोर्टाला सांगितले की, सोमवारी आफताबसोबत 50 मिनिटांच्या दीर्घ चर्चेनंतर त्याने जामीन अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. चुकीच्या माहितीमुळे याचिका दाखल करण्यात आल्याचे वकिलाने कोर्टाला स्पष्टपणे सांगितले. दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयात जबाब नोंदवताना, आफताब पूनावालाला जामीन देऊ नये, कारण त्याच्या गुन्ह्याचा समाजावर खोलवर परिणाम झाला असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, 17 डिसेंबर रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीदरम्यान आफताबच्या वकिलाने आपल्या अशिलाशी बोलण्यासाठी वेळ मागितला होता. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आफताब दिल्ली न्यायालयात हजर असताना 17 डिसेंबर रोजी वकिलाने सांगितले की, त्याच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता हे मला माहीत नाही. आफताबने न्यायालयाला सांगितले की, मी 'वकलतनमा'वर स्वाक्षरी केली आहे, परंतु माझ्या वतीने जामीन अर्ज दाखल केला जाईल याची कल्पना नव्हती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांनी सांगितले की, जामीन अर्ज प्रलंबित राहणार असून आरोपी वकिलाला भेटल्यानंतरच जामीन अर्ज सादर करायचा की नाही हे ठरवले जाईल.

दुसरीकडे, आफताबने माझ्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आफताबला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबीयांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. त्याने माझ्या मुलीला जशी शिक्षा केली तशीच त्यालाही शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशी द्यावी अशी माझी इच्छा आहे. जे माझ्या मुलीचे झाले ते कोणाच्याही बाबतीत घडू नये, असेही विकास वालकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT