Aftab Dainik Gomantak
देश

Shraddha Murder Case: नार्को टेस्टमध्ये आफताबला विचारले जावू शकतात हे 50 प्रश्न

Delhi Shraddha Murder Case: न्यायालयाने शुक्रवारी (18 नोव्हेंबर) याबाबत निर्देश दिले होते.

दैनिक गोमन्तक

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची सोमवारी नार्को टेस्ट होऊ शकते. दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात ही चाचणी केली जाणार आहे. न्यायालयाने पोलिसांना आरोपीची पाच दिवसांत नार्को टेस्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, नार्को टेस्टमध्ये आफताब अमीन पूनावालाला 50 हून अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. आफताबने 18 मे रोजी संध्याकाळी त्याची 'लिव्ह-इन पार्टनर' श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौलीच्या जंगलासह विविध ठिकाणी फेकून दिले.

नार्को टेस्टमध्ये विचारले जाणारे संभाव्य प्रश्न

1. तुझे पूर्ण नाव काय आहे?

2. तुझी जन्मतारीख काय आहे?

3. तु कुठून येतो?

4. घराचा पत्ता काय आहे?

5. तुझ्या पालकांचे नाव काय आहे?

6. तु कोणती नोकरी करत होता?

7. तु श्रद्धा वालकरला कसा ओळखतो?

8. श्रद्धा कुठे राहायची?

9. तुम्ही दोघे कुठे भेटलात?

10. तुला श्रद्धा कशी माहीत होती?

11.शवागरात तुझे येणे जाणे होते का?

12. तुमचे नाते कसे होते?

13. तुम्ही दोघे कधीपासून एकत्र राहत होता?

14. श्रद्धाचे कुटुंबीय तुमच्या नातेसंबंधावर खूश होते का?

15. तुझे कुटुंबीय तुमच्या नातेसंबंधावर खूश होते का?

16. तु मुंबईत कुठे राहतो?

17. तुझे नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबईत श्रद्धासोबत भांडण झाले का?

18. भांडणाचे कारण काय होते?

19. तुम्ही दोघांनी मुंबई कधी सोडले?

20. मुंबई सोडल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा कुठे गेला होतात?

21. तुम्ही दिल्लीला कधी पोहोचलात?

22. तुम्ही दिल्लीत कुठे राहिलात?

23. तुम्ही मेहरौलीच्या घरात कोणत्या दिवशी शिफ्ट झालात?

24. 18 मे रोजी काय घडले?

25. तुमच्या दोघांमध्ये भांडण झाले का?

26. कशावरुन भांडण झाले?

27. रुममध्ये काय झाले?

28. तू का रागावला होतास?

29. तु श्रद्धाला मारले का?

30. त्यावेळी तु दारुच्या नशेत होता का?

31. तु खून कसा केला?

32. श्रद्धाला मारल्यानंतर तु काय केले?

33. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तु काय केले?

34. तु प्रेताचे तुकडे केले का?

35. मृतदेहाचे किती तुकडे केले?

36. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी शस्त्रे कोठून खरेदी केली होती?

37. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्याच शस्त्राचा वापर केला होता का?

38. फ्रीज कुठून विकत घेतला?

39. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले?

40. श्रद्धाचा मोबाईल कुठे आहे?

41. हत्येच्या दिवशी तु आणि श्रद्धाने घातलेले कपडे कुठे आहेत?

42. शस्त्र कुठे फेकले?

43. किती दिवस मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकत राहिला?

44. मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकण्याची कल्पना कुठून आली?

45. श्रद्धाच्या हत्येनंतर इतर मुलींनाही घरात आणले का?

46. ​​त्या मुलींशी तुझी ओळख कशी झाली?

47. श्रद्धाच्या हत्येबद्दल तुझ्या कुटुंबीयांना किंवा कोणाला सांगितले का?

48. श्रद्धाला मारल्यानंतर घरी आलेली मुलगी कोण होती?

49. श्रद्धाच्या हत्येची योजना कधी आखली होती?

50. हे घर फक्त खून करण्यासाठी घेतले होते का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT