Shraddha Murder Case: आफताबला फाशी द्या; श्रद्धाच्या वडिलांची दिल्ली पोलिसांकडे मागणी

Delhi News: आफताब पूनावाला याने श्रद्धाचा फोन फेकून दिल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
Shraddha Murder Case
Shraddha Murder CaseDainik Gomantak

Shraddha Murder Case: आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी श्रद्धा पालकरच्या वडिलांनी केली आहे. यासोबतच त्यांनी दिल्ली पोलिसांच्या तपासावर विश्वास व्यक्त केला आहे. आफताबच्या संपर्कात नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. दिल्ली पोलीस आफताबला घेऊन मंगस्वारवरील मेहरौलीच्या जंगलात पोहोचले. आफताबची चौकशी करून हत्येत वापरलेले हत्यार आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष जप्त करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. 

  • काय म्हणाले श्रद्धाचे वडिल

श्रद्धाचे वडील विकास वॉकर यांनी वृत्तसंस्था एएनआयसोबत (ANI) बोलतांना सांगितले, “आम्ही आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करतो. मला विश्वास आहे की दिल्ली पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालला आहे. श्रद्धा तिच्या काकांच्या जवळ होती, माझ्याशी जास्त बोलली नाही.” श्रद्धाचे वडील म्हणाले, “मी कधीच आफताबच्या संपर्कात नव्हतो. मी पहिली तक्रार वसईत केली होती.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आफताब पूनावालाला मेहरौली जंगलातील त्या ठिकाणी नेले आहे जिथे त्याने श्रद्धाच्या शरीराच्या काही तुकड्यांची विल्हेवाट लावली होती. आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आफताबने पोलिसांना सांगितले की, 'येस आय किल्ड हर' म्हणजे होय मी त्याला मारले. आफताबने श्रद्धाचा फोन फेकल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचे शेवटचे लोकेशन ट्रेस केले जात आहे जेणेकरून त्याला परत मिळवता येईल. पोलिसांचे म्हणणे आहे की, जूनपर्यंत श्रद्धाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट वापरून ती जिवंत असल्याचा आभास दिला.

  • आफताबने 18 दिवसांत श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने मृत तरुणीचे 35 तुकडे घरामध्ये ठेवले होते. यासाठी तरुणाने नवा फ्रिज घेतला होता. तब्बल 18 दिवस त्याने मृतदेहाचे तुकडे घरात ठेवले होते. आरोपी रात्री दोन वाजता मृत तरुणीच्या शरीराचे तुकडे फेकून देत असे. विशेष म्हणजे, मृतदेहाचे 35 तुकडे सापडले आहेत. आफताबला सोमवारी दिल्ली न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दिल्ली पोलीस त्याची चौकशी करत असून हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि मृतदेहाचे अवशेष जप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com