Shigella Bacteria
Shigella Bacteria  Dainik Gomantak
देश

केरळमध्ये 'शिगेला'चा कहर, काहीही खाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

दैनिक गोमन्तक

देश अद्याप कोरोना विषाणूच्या भीतीपासून मुक्त झालेला नाही आणि केरळमध्ये शिगेला बॅक्टेरियाची भीती पसरली आहे. केरळमधील कासारगोडमध्ये 58 लोक आजारी पडले असून शिगेला बॅक्टेरिया असलेले अन्न खाल्ल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. शिगेला बद्दल बोलायचे झाले तर हा आजार दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे पसरतो. या आजाराचा मुख्य स्त्रोत अन्नामध्ये वाढणारे बॅक्टेरिया असल्याचे सांगितले जाते. (Shigella Bacteria Outbreak in Kerala)

शिगेला हा जिवाणू दूषित अन्नामध्ये वाढतो त्यामुळे तो चोविस तास आपल्या घरात वाढतो असं म्हणायला हरकत नाही. मृत मुलीने केरळमधील शवरमा ही डिश खाल्ली होती. अस्वच्छ वातावरणात बनवलेले दूषित, शिळे आणि कमी शिजलेले अन्न हे शिगेला वाढण्याचे कारण असल्याचे सांगितले जाते. शिगेला बॅक्टेरिया प्रथम एखाद्या व्यक्तीच्या आतड्यांवर परिणाम करतात. ते आतड्यांना संक्रमित करते आणि हळूहळू आपली प्रकृती गंभीर होत जाते.आतड्यांतील संसर्गामुळे अतिसार, तीव्र ताप आणि पोटदुखीचा त्रास होतो आणि व्यक्तीची पचनसंस्था बॅक्टेरियाच्या तावडीत सापडल्याने कमजोर पडते. आतड्यांमध्ये जीवाणूंचा संसर्ग झाल्यानंतर याचा थेट मेंदूच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो.

  • शिगेलाचे लक्षण -

- पोटदुखी

- ताप

- जुलाब

- डोकेदुखी

- उलट्या

- थकवा

- मल मध्ये रक्त

बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यानंतर अतिसारामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि त्यामुळे स्थिती बिघडते. साधारणपणे, सामान्य रुग्ण दोन ते तीन दिवसांत द्रव आणि सामान्य औषधांच्या मदतीने बरे होऊ शकतात परंतु गंभीर रुग्णांना सात ते आठ दिवस त्रास झाल्यानंतर द्रव आणि प्रतिजैविक दिले जातात. योग्य वेळी उपचार न केल्यास, तापामुळे मेंदूची यंत्रणा आकुंचन पावते, ज्यामुळे केरळमधील मुलीप्रमाणेच मृत्यूही होऊ शकतो.

दूषित अन्न खाल्लेल्या केरळमधील देवानंदच्या वैद्यकीय अहवालात आतडे आणि मेंदू प्रणालीलाही शिगेला बॅक्टेरियाची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे.शिगेला दूषित पाण्यामुळेही पसरतो. विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात ज्यामध्ये योग्य प्रकारे शिजवलेले अन्नही काही तासांत खराब होते, कमी शिजवलेले अन्न शिगेलाला आमंत्रण देते.

  • शिगेला टाळायचा असेल तर जेवण बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा.

  • अन्न पूर्णपणे शिजवलेले असले पाहिजे, म्हणजे कमी शिजवलेले नाही

  • अन्न स्वच्छ वातावरणात तयार केले पाहिजे, स्वयंपाक करतांना हात स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत

  • स्वच्छ पाण्याचा वापर करावा

  • भाजीपाला आणि भांडी पूर्णपणे स्वच्छ केली पाहिजेत

  • पनीर आणि मासे वापरताना विशेष काळजी घ्या कारण येथे बॅक्टेरिया लवकर वाढतात

अशा परिस्थितीत, प्रत्येकाने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की उन्हाळ्याच्या हंगामात, आपण बाहेर किंवा कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये काहीतरी खात असाल किंवा आपण घरी अन्न शिजवत असाल तर ते पूर्णपणे स्वच्छ असले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cylinder Blast In Bambolim: बांबोळीत दोन सिलिंडरचा स्फोट; मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग

Israel Hamas War: ‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

Goa Today's Live News: मुख्यमंत्री सावंत यांनी सपत्नीक घेतले लईराई देवीचे दर्शन

Goa SSC Board Result: गोवा बोर्डाचा दहावीचा बुधवारी निकाल

Vasco News : सडा येथील ‘रोज सर्कल’ मैदान रात्रीच्यावेळी मद्यपींचा अड्डा; कारवाई करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT