'अजान इस्लामचा भाग, लाऊडस्पीकर नाही': अलाहाबाद उच्च न्यायालय

अजान हा इस्लामचा भाग आहे, मात्र लाऊडस्पीकर नाही, असेही निरिक्षण यावेळी उच्च न्यायालयाने नोंदवले.
Allahabad High Court on Loudspeaker
Allahabad High Court on LoudspeakerDainik Gomantak

अलाहाबाद उच्च न्यायालयाने लाऊडस्पीकद्वारे अजान देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. लाऊडस्पीकरवरुन अजान देणे हा मूलभूत अधिकार नसल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) म्हटले आहे. याचिकेत लाऊडस्पीकरवरुन अजान देण्याची मागणी करण्यात आली होती. (Allahabad High Court on Loudspeaker)

दरम्यान, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बदायूं येथील रहिवासी असलेल्या इरफान यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन नूरी मशिदीतून लाऊडस्पीकरवरुन अजान देण्याची मागणी केली होती. आता ही याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Allahabad High Court on Loudspeaker
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली

तसेच, अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण टिप्पणी करताना म्हटले की, 'अजान हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे, परंतु लाऊडस्पीकरद्वारे अजान देणे इस्लामचा भाग नाही.'

याशिवाय, न्यायमूर्ती बीके विडला आणि न्यायमूर्ती विकास यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. विशेष म्हणजे यूपी-महाराष्ट्रासह (Maharashtra) अनेक राज्यांमध्ये लाऊडस्पीकरवरुन वाद सुरु आहेत. दरम्यान, यूपीमध्ये मोठ्या प्रमाणावर मंदिरे आणि मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. याशिवाय अनेक धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com