Shefali Jariwala Death Dainik Gomantak
देश

Shefali Jariwala Death: मनोरंजन विश्वात खळबळ! बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन

Shefali Jariwala Passes Away: बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झाले. पहाटे १:३० वाजता शेफालीच्या छातीत वेदना जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Sameer Amunekar

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झाले. पहाटे १:३० वाजता शेफालीच्या छातीत वेदना जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. फिटनेस फ्रिक आणि कामुक शरीरयष्टीची मालकीण असलेल्या शेफालीच्या मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे सांगितले जात आहे.

शेफालीच्या मृत्यूची बातमीनं विश्वात खळबळ उडाली आहे. बॉलिवूड पोस्ट शेअर करून तिलाश्रद्धांजली वाहत आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून शेफालीच्या निधनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

दिव्यांका त्रिपाठीने पोस्टमध्ये 'मला विश्वास बसत नाही की शेफालीचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झाले. तू खूप लवकर निघून गेलीस. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो.' असं म्हणतात दुःख व्यक्त केलं.

२०२२ मध्ये आलेल्या 'कांटा गला’' या म्युझिक व्हिडिओमुळे शेफाली जरीवालला प्रसिद्धी मिळाली. या गाण्याने शेफालीला रातोरात स्टार बनवले. त्यानंतर शेफालीने २००४ मध्ये 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातही काम केले.

त्यानंतर शेफाली ग्लॅमरच्या जगात काम करत राहिली आणि कौतुकाची थाप मिळवत राहिली. शेफालीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. यासोबतच ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे.

शेफालीने २००४ मध्ये संगीतकार जोडी मीत ब्रदर्समधील गायक हरमीत सिंगशी लग्न केले. पण शेफाली या लग्नात आनंदी राहू शकली नाही आणि काही काळानंतर तिचा घटस्फोट झाला.

यानंतर शेफालीची टीव्ही जगतातील देखणा आणि हंक अभिनेता पराग त्यागीशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले. त्यानंतर दोघेही मुंबईत आनंदाने राहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT