SCO Summit 2023 Goa
SCO Summit 2023 Goa Gomantak Digital
देश

SCO Summit 2023: गोव्यात सुरू असलेल्या SCO चं Full Form, सदस्य देश माहितीये?

गोमन्तक वृत्तसेवा

SCO Summit 2023 Goa

गोव्यातील बाणावली येथे गुरुवारपासून शांघाय सहकार्य संघटनेच्या (Shanghai Cooperation Organisation - SCO) दोन दिवसीय परिषदेला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे गोव्यात पोहोचले असून ही संघटना म्हणजे नेमकी काय, त्यामागचा उद्देश काय आणि गोव्यातील या परिषदेचं महत्त्व हे जाणून घेऊया...

शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना (sco full form)

शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना १५ जून २००१ रोजी झाली. सुरूवातीला चीनसह रशिया, ताजिकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझस्तान या देशांचा संघटनेत समावेश होता. यात चीनवगळता अन्य देश हे पूर्वी सोव्हिएत संघराज्याचे भाग होते. जून २००१ मध्ये उझबेकिस्तानचा या संघटनेत समावेश करण्यात आला. तर जून २०१७ मध्ये रशियाच्या आग्रहास्तवर भारत तर चीनमुळे पाकिस्तान या देशांचाही ‘एससीओ’त समावेश करण्यात आला. (SCO Members)

संघटनेचा उद्देश काय?

चीनवगळता संघटनेत असलेले देश हे सोव्हिएतचा भाग होते. सोव्हिएतच्या विघटनानंतर सीमावाद सोडवणे हा यामागील प्रमुख उद्देश होता. मात्र, त्यानंतर सुरक्षा, दहशतवाद, आर्थिक संबंध यातही संघटना काम करत आहे. पाश्चिमात्यांच्या ‘नाटो’ला टक्कर देण्यासाठी आशियात ‘एससीओ’ची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, नाटोसारखी लष्करी आघाडीची तरतुद या संघटनेत नाही, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधलंय.

‘एससीओ’चं मुख्यालय कुठे आहे?

एससीओचं सचिवालय हे बीजिंग येथे आहे. तर संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या दहशतवादविरोधी समितीचं मुख्यालय हे ताश्कंद येथे आहे.

‘एससीओ’ची रचना

एससीओमध्ये अनेक समित्या आहेत. यातील राष्ट्रप्रमुखांची समिती ही सर्वोच्च समिती आहे. तर शासकीय प्रमुखांच्या समितीचा संघटनेत दुसरा क्रमांत येतो. या समितीची दरवर्षी शिखर परिषद होते. गोव्यात होत असलेली परिषद हे ‘एससीओ’मधील परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आहे. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी हे पहिल्यांदाच आमने सामने येणार असल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. (Bilawal Bhutto India Visit)

या संघटनेचं महत्त्व काय?

ही युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे. भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या दृष्टीनेही जगातील सर्वांत मोठी प्रादेशिक संस्था आहे, जी युरेशियाच्या सुमारे ६० टक्के क्षेत्रफळ व्यापते. जगाच्या लोकसंख्येपैकी ४२ टक्के लोकसंख्या या भागात येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT