Sexual Harassment At Workplaces  Dainik Gomantak
देश

Sexual Harassment At Workplaces : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कसे थांबणार? तक्रारदारांना सुरक्षा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेस कोर्टाचा नकार

Supremen Court: यावेळी न्यायालयाने नमूद केले की ते या प्रकरणाची सुनावणी करण्यास इच्छुक नाहीत, परंतु याचिकाकर्त्याला निर्णय घेण्यासाठी सरकारकडे दाद मागण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

Ashutosh Masgaunde

PIL on Sexual Harassment At Workplaces : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाबाबत तक्रार दाखले करणारे पीडित आणि साक्षिदारांना संरक्षण द्यावे अशी मागणी करणारी याचीका दाखल करुन घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

यापूर्वी याच याचिकाकर्त्याने याच मागणीसाठी दाखल केलेली जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी 2020 मध्येही स्वीकारण्यास नकार दिला होता.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने टिप्पणी केली की, याचिकाकर्त्याला विशिष्ट उदाहरणे दाखवावी लागतील जिथे लैंगिक छळाच्या तक्रारींतील तक्रारदार/साक्षीदार/अन्य व्यक्तींना आरोपी व्यक्तींकडून सूड घेण्याच्या/पीडितांच्या कृत्यांमुळे नुकसान होत आहे.

याचिकाकर्त्यांच्या वकिलाने असे सादर केले की, केंद्र सरकारने तक्रारदारांना सूडाच्या कारवाईपासून संरक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र यातून खाजगी क्षेत्र वेगळे राहिले आहे.

यावेळी न्यायालयाने नमूद केले की ते या प्रकरणाची सुनावणी करण्यास इच्छुक नाहीत, परंतु याचिकाकर्त्याला निर्णय घेण्यासाठी सरकारकडे दाद मागण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये साक्षीदार आणि तक्रारदारांच्या संरक्षणासाठी निर्देश मागणाऱ्या वकील सुनीता थवानी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT