Sri Krishna Janmasthan Idgah Case Dainik Gomantak
देश

Allahabad High Court: श्रीकृष्ण जन्मस्थान ईदगाह प्रकरणी मुस्लिम पक्षाला मोठा झटका, अलाहाबाद HC ने...

Sri Krishna Janmasthan Idgah Case: न्यायमूर्ती प्रकाश पडिया यांनी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि इतरांच्या याचिकेवर हा आदेश दिला आहे.

Manish Jadhav

Sri Krishna Janmasthan Idgah Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी कटरा केशवदेवच्या नावाने नोंदवलेल्या ईदगाहच्या जमिनीच्या वादाबाबत मथुरा जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, न्यायमूर्ती प्रकाश पडिया यांनी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि इतरांच्या याचिकेवर हा आदेश दिला आहे. अंतरिम आदेश आणि फेरविचार आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने (Court) निकाली काढली आहे.

तसेच, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचा आक्षेप ऐकून न्यायालयाने दिवाणी खटला 30 सप्टेंबर 20 रोजी फेटाळला. त्याविरुद्ध भगवान कृष्ण विराजमान यांच्या वतीने अपील दाखल करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश मथुरा यांच्या न्यायालयाने अर्ज स्वीकारताना अपीलचे पुनरीक्षण अर्जात रुपांतर केले होते.

दुसरीकडे, खटल्यातील वस्तुस्थितीनुसार, भगवान श्रीकृष्ण विराजमान कटरा केशव देव मथुरा यांच्या वतीने दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या दिवाणी प्रकरणात 20 जुलै 1973 चा निर्णय रद्द करुन कटरा केशव देव यांची 13.37 एकर जमीन भगवान श्रीकृष्णाच्या नावाने घोषित करण्याची मागणी केली होती.

प्रतिवादी पक्षकार नसल्याने 1973 मध्ये जमिनीबाबत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या कराराच्या आधारे दिलेला निर्णय वादीला लागू होणार नाही, असे फिर्यादीच्या वतीने सांगण्यात आले.

तसेच, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचा आक्षेप ऐकून न्यायालयाने दिवाणी खटला 30 सप्टेंबर 20 रोजी फेटाळला. त्याविरुद्ध भगवान कृष्ण विराजमान यांच्या वतीने अपील दाखल करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश मथुरा यांच्या कोर्टाने अर्ज स्वीकारताना अपीलचे पुनरीक्षण अर्जात रुपांतर केले होते.

दुसरीकडे, फेरविचार याचिकेवर पाच प्रश्न तयार करण्यात आले. 19 मे 22 रोजी, जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाने 30 सप्टेंबर 2020 रोजीचा दिवाणी न्यायाधीशांचा खटला फेटाळण्याचा आदेश रद्द केला आणि दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नियमानुसार आदेश पारित करण्याचे निर्देश अधीनस्थ न्यायालयाला दिले. या याचिकांमध्ये या आदेशाच्या कायदेशीरतेला आव्हान देण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Unity Mall Goa Controversy: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी

Goa Jail: कैद्यांच्या जेवणावर होणार 90 ऐवजी 123 रुपये खर्च! दरवाढ लागू; पोषणमान, महागाईचा विचार करून निर्णय

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

SCROLL FOR NEXT