Allahabad High Court: शाळेची फी परत करण्याबाबत अलाहाबाद HC चा मोठा निर्णय, पालकांना...

Allahabad High Court Order on School Fees: अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोविड काळातही आपल्या मुलांच्या शाळेची फी भरणाऱ्या पालकांना मोठा दिलासा दिला आहे.
Allahabad High court
Allahabad High courtDainik Gomantak
Published on
Updated on

Allahabad High Court Order on School Fees: अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोविड काळातही आपल्या मुलांच्या शाळेची फी भरणाऱ्या पालकांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने शाळांना कोरोना कालावधीसाठी 15 टक्के शुल्क माफ करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने 2020-21 या सत्रासाठी राज्यातील सर्व शाळांबाबत या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, 2020-21 च्या सत्रात जमा झालेल्या शुल्कापैकी 15 टक्के शुल्क पुढील सत्रात समायोजित करावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना 15 टक्के शुल्क परत करावे लागणार आहे. डझनभर याचिकाकर्त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाला (Allahabad High Court) कोविड कालावधीसाठी शुल्क माफ करण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती जेजे मुनीर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

Allahabad High court
Allahabad High Court: कुटुंबात मुलीपेक्षा विधवा सुनेला मिळणार जास्त अधिकार

तसेच, शुल्क माफीसाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सहा जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला. सत्र 2020-21 दरम्यान, लॉकडाऊन (Lockdown) होता, त्यामुळे शाळा बंद होत्या. परंतु ऑनलाइन स्टडी सुरु होता. असे असतानाही शाळांनी पालकांकडून संपूर्ण शुल्काची मागणी केली. यानंतर पालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay High Court Goa Visa Order
Goa High Court Minor Child
Madhya Pradesh Murder Case
Carapur Retaining Wall
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com