vaccine Dainik Gomantak
देश

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने का थांबवलं लसींचं उत्पादन

देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दुसरीकडे मात्र जगातील सर्वात मोठ्या लस निर्मीती करणाऱ्या कंपनीने लस उत्पादन थांबवले आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दुसरीकडे मात्र जगातील सर्वात मोठ्या लस निर्मीती करणाऱ्या कंपनीने लस उत्पादन थांबवले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Covishield चे उत्पादन थांबवले आहे. कंपनीचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute of India) कोविडशील्डचे 100 कोटींहून अधिक डोस तयार केले आहेत. विशेष म्हणजे जगातील इतर गरीब देशांमध्ये कोरोना लसीचा (Vaccine) पुरवठा सीरमकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आता जगात कोरोना लसीचा अतिरिक्त साठा झाला आहे. 'जगातील फार्मसी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताने गेल्या वर्षी कोरोनाशी लढण्यासाठी लसीची मर्यादित निर्यात केली. यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा लसीची निर्यात सुरू करण्यात आली.

SII चे CEO अदर पूनावाला यांनी सांगितले की कंपनीकडे कोविड-19 लसीचे 200 दशलक्ष डोस स्टॉकमध्ये आहेत. ते म्हणाले, “आम्ही डिसेंबरमध्ये उत्पादन बंद केले होते. गरजूंना मोफत देण्याची तयारीही दिली. त्याचे काय करावे हे मला कळत नव्हते. त्यामुळे मला लसिचे उत्पादन थांबवण्यास सांगावे लागले." भारताच्या औषध नियामकाने Covishield चा वापर उत्पादनाच्या 9 महिन्यांनंतरच करण्याचा सल्ला दिला आहे. SII च्या प्रवक्त्यानुसार, उत्पादन फक्त Covishield साठी थांबले आहे. विशेष म्हणजे, SII अमेरिकन फार्मा कंपनी Novavax च्या Kovovax चे उत्पादन देखील करते.

मागणी आणि पुरवठ्यातील वाढती तफावत

गेल्या वर्षीच्या मध्यापासून कोविड-19 लसीचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त झाले आहे आणि ही तफावत वाढत आहे. मात्र, आजही कोट्यवधी लोकांना कोविड-19 ची लस मिळालेली नाही. यातील बहुतांश लोक विकसनशील देशांतील आहेत. भारत हा तिसरा सर्वाधिक कोविड-19 प्रभावित देश आहे आणि आतापर्यंत 187 कोटी डोस लागू केले आहेत. भारतात, कोविड-19 लसीचे दोन डोस 12 वर्षे आणि त्यावरील नागरिकांना दिले जात आहेत. त्याचवेळी, देशात कोविड-19 ची प्रकरणे पूर्वीपेक्षा कमी झाली आहेत, परंतु एप्रिलच्या अखेरीस कोविड-19 ने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. शनिवारी भारतात कोविड-19 चे 2500 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final: तगड्या मास्टरप्लॅनची गरज! WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला पुढील 9 पैकी किती सामने जिंकावे लागणार?

Sheikh Hasina: फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा झटका, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुनावली 21 वर्षांची शिक्षा; अवामी लीगचा राजकीय षडयंत्राचा आरोप

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

SCROLL FOR NEXT