"Sending children under three to pre-school illegal", Gujarat High Court Slams Parents. Dainik Gomantak
देश

"तीन वर्षांखालील मुलांना प्री-स्कूलमध्ये पाठवणे हे बेकायदेशीर कृत्य", हायकोर्टाने पालकांना फटकारले

RTE कायद्याअंतर्ग मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठी वयाची सहा वर्षे पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय मुलाला RTE कायद्यांतर्गत प्रवेश देणे बेकायदेशीर आहे.

Ashutosh Masgaunde

"Sending children under three to pre-school illegal", Gujarat High Court Slams Parents:

2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा सहा वर्षांची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका गुजरात उच्च न्यायालयाने नुकत्याच फेटाळून लावल्या.

हा निर्णय देताना मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने असे सांगितले की, "तीन वर्षांखालील मुलांना प्री-स्कूलमध्ये जाण्यास भाग पाडणारे पालक 'बेकायदेशीर कृत्य' करत आहेत."

प्री-स्कूलमध्ये तीन वर्षांचे शिक्षण मुलाला पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी मानसिकरित्या तयार करते. त्यामुळे 3 वर्षांच्या मुलाला जबरदस्तीने शाळेत पाठवणे हे पालकांचे बेकायदेशीर कृत्य आहे. प्री स्कूलमध्ये ३ वर्षांचे शिक्षण घेतल्यानंतरच मुले पहिलीच्या वर्गासाठी पूर्णपणे तयार होतात.
मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया

1 जून 2023 रोजी सहा वर्षे पूर्ण न केलेल्या मुलांच्या पालकांच्या एका गटाने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 1 मधील प्रवेशासाठी 6 वर्षांची वयोमर्यादा निश्चित करणाऱ्या राज्य सरकारच्या 31 जानेवारी 2020 च्या अधिसूचनेला आव्हान दिले होते.

यावर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत म्हटले, "याचिकाकर्ते शिक्षण हक्क कायदा, 2009 च्या आदेशाचे उल्लंघनासाठी दोषी आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षासाठी 1 जून ही कट ऑफ डेट निश्चित करण्याला आमचा विरोध आहे. कारण त्यामुळे चालू शैक्षणिक सत्रात राज्यातील सुमारे नऊ लाख मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाईल. ज्या मुलांनी प्री स्कूलची तीन वर्षे पूर्ण केली आहेत परंतु 1 जून 2023 पर्यंत वयाची सहा वर्षे पूर्ण केली नाहीत, त्यांना सूट देण्यात यावी आणि चालू शैक्षणिक वर्षात त्यांचा समावेश करावा.

यावर न्यायालय म्हणाले, RTE कायद्याअंतर्ग मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठी वयाची सहा वर्षे पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय मुलाला RTE कायद्यांतर्गत प्रवेश देणे बेकायदेशीर आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 नुसार, मुलाच्या संचित मेंदूच्या विकासापैकी 85 टक्क्यांहून अधिक विकास वयाच्या सहाव्या वर्षापूर्वी होतो. त्यामुळे मेंदूचा निरोगी विकास आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी सुरुवातीच्या काळात योग्य काळजी आणि मेंदूला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित होते. असे, न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात आला कामाच्या शोधात, सोबत आणला गांजा; ओडिशातील 29 वर्षीय युवकाच्या आवळल्या मुसक्या

Goa Politics: खरी कुजबुज; घोडा काँग्रेसच्या वाटेवर?

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

Goa News: 28 गुन्ह्यांचे अपराधीकरण झाले रद्द! गोवा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; तुरुंगवासाऐवजी दंडाची तरतूद

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

SCROLL FOR NEXT