Seema Haider & sachin  Dainik Gomantak
देश

Seema Haider Love Story: T-20 वर्ल्डकपनंतर सीमा हैदर सचिनला सोडणार? पाकिस्तानी मैत्रिणीचा धक्कादायक दावा

T-20 World Cup: पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडातील सचिन मीना यांची प्रेमकहाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Manish Jadhav

Seema Haider: पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडातील सचिन मीना यांची प्रेमकहाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सीमा हैदरबाबत आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत, मात्र तिच्या पाकिस्तानातील एका मैत्रिणीने केलेला दावा आश्चर्यचकित करणारा आहे.

सीमाच्या त्या मैत्रिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या मैत्रिणीने एका यूट्यूब चॅनलवर हा दावा केला आहे.

पाकिस्तानात (Pakistan) राहणाऱ्या सीमाच्या एका मैत्रिणीचे म्हणणे आहे की, 'ती टी-20 क्रिकेट विश्वचषकानंतर सचिन मीणाला सोडून जाईल. ती भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी भारतात गेली आहे.' सीमा हैदरच्या भारतात गेल्याने संतापलेल्या तिच्या मैत्रिणीनेही ती सायको असल्याचे सांगितले आहे.

मैत्रिणीने सीमाला चीटर म्हटले

ती एक चीटर महिला असल्याचेही तिने सांगितले. जे तिच्या पतीसोबत घडले ते इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये. तिचे पाकिस्तानमध्ये अनेक अफेअर्स आहेत, त्यामुळे ती कोणाचीही खरी मैत्रीण होऊ शकत नाही. ती केवळ विश्वचषक होईपर्यंत सचिन मीणासोबत आहे, असेही ती पुढे म्हणाली.

सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहतेय

सीमा हैदर पाकिस्तानची रहिवासी असून सचिन मीनासोबत सध्या ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळत असताना सीमा हैदर आणि सचिन प्रेमात पडले. सीमाने बेकायदेशीरपणे भारतात (India) प्रवेश केला. त्यानंतर सचिनसोबत सीमाला पोलिसांनी अटक केली. मात्र, त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला. सीमाने हिंदू धर्म स्वीकारला आहे. तिने नॉनव्हेज खाणेही बंद केले आहे.

पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया

बुधवारी सीमा हैदरच्या मुद्द्यावर पाकिस्तान सरकारकडून प्रतिक्रिया आली. पाकिस्तानकडून सीमा हैदरबद्दल विचारण्यात आले आहे. आता आम्ही भारतीय अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT