Security tightened ahead of Prime Minister visit to Palli  ANI
देश

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये कडक बंदोबस्त, उद्या पंचायतींना करणार संबोधित

पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) दौऱ्याआधीच सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांचा (Terrorist) मोठा कट उधळून लावला

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीर: पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) दौऱ्याआधीच सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांचा (Terrorist) मोठा कट उधळून लावला आहे. खरं तर, पहाटे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या बसवर गोळीबार केला होता. यादरम्यान सीआयएसएफचा एक एएसआय शहीद झाला. दुसरीकडे, सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले. यादरम्यान दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, यावरून पंतप्रधानांच्या सांबा दौऱ्यापूर्वी मोठा कट रचण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होते.आज पंतप्रधानांच्या पल्ली दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पंचायत राज दिवानिमित्त पंतप्रधान मोदी उद्या, 24 एप्रिल रोजी गावाला भेट देणार असून पंचायतींना संबोधित करणार आहेत.

दरम्यान काल सकाळी दहशतवाद्यांनी नेहमीच्या ड्युटीवर जाणाऱ्या सीआयएसएफ जवानांनी भरलेल्या बसवर गोळीबार केला. सकाळी 4.15 च्या सुमारास चढ्ढा कॅम्पजवळ हा हल्ला झाला.या हल्ल्यात सीआयएसएफचे सहायक उपनिरीक्षक एसपी पाटील हे शहीद झाले. तसेच अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. यानंतर सुरक्षा दलाकडून प्रत्युत्तराची कारवाई सुरू झाली.

दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी माहिती दिली की, जैश-ए-मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना इजा करण्याच्या उद्देशाने सुजवान भागात हल्ला केला होता. या हल्ल्याचे खंडन करत दोन दहशतवादी मारले गेले आहेत.

डीजीपी म्हणाले की हा राज्यातील काही मोठ्या दहशतवादी कटाचा एक भाग असू शकतो आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला होता जो अयशस्वी झाला. एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून 2 एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडली आहेत. यासोबतच दोन सॅटेलाइट फोन आणि काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT