Satyapal Malik said that PM Modi is arrogant

 

Dainik Gomantak

देश

5 मिनिटांच्या बैठकीत मलिक आणि मोदींमध्ये वादाची ठिणगी

जेव्हा मी त्यांना सांगितले की आमचे 500 लोक मेले, तेव्हा ते म्हणाले की, त्यांनी माझ्यासाठी जीव दिला का?

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : गोव्याचे माजी आणि मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पीएम मोदींना अहंकारी असल्याचे म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभेत पंतप्रधानांशी त्यांचा वाद झाला, कारण ते खूप अहंकारी आहेत. असे गव्हर्नर मलिक म्हणाले. जेव्हा मी शेतकऱ्यांच्या संदर्भात पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो, तेव्हा पाच मिनिटांत माझा त्यांच्याशी वाद झाला असे मलिक यांनी सांगितले.

त्यांनी माझ्यासाठी जीव दिला का?

'शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी पंतप्रधानांची (PM Modi)भेट घेतली. जेव्हा मी त्यांना सांगितले की आमचे 500 लोक मेले, तेव्हा ते म्हणाले की त्यांनी माझ्यासाठी जीव दिला का? अवघ्या पाच मिनिटांच्या भेटीत माझा त्याच्याशी वाद झाला. यानंतर मोदींनी मला अमित शहांना भेटायला सांगितले आणि मग मी अमित शहांना भेटलो,' हरियाणातील चरखी दादरी येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर सत्यपाल मलिक (Satyapal Malik) बोलत होते आणि त्यांनी यावेळी त्यांनी पीएम मोदींसोबतच्या भेटीबद्दलचा हा किस्सा सांगितला.

सरकारला इशारा दिला

सत्यपाल मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, शेतकरी आंदोलनात दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याबरोबरच एमएसपीची कायदेशीर अंमलबजावणी करण्याचे काम सरकारने प्रामाणिकपणे करावे. आंदोलन संपले असा सरकारचा विचार असेल तर ते चुकीचे आहे. आंदोलन संपलेले नाही, तर पुढे ढकलण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून अतिरेक झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करू, असा इशारा त्यांनी दिला.

'बरखास्त होण्याची भीती नाही'

आता शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाले पाहिजेत, असे मलिक म्हणाले. त्यांना पदावरून हटवण्याची भीती वाटत नाही, त्यांनी चौधरी चरणसिंग यांच्यासोबत राजकारण केले असून प्रत्येक परिस्थितीत ते शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांना कोणतेही पद सोडावे लागले तरी चालेल. सत्यपाल मलिक दीर्घकाळापासून शेतकऱ्यांच्या आंदोलनावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या बाजूने होते. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ते केंद्र सरकारवर सातत्याने दबाव आणत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT