Akhilesh Yadav  Dainik Gomantak
देश

'सरदार पटेलांनी RSS वर बंदी घातली होती...', अखिलेश यादव यांचा भाजपवर जोरदार हल्ला

Karnataka Assembly Election 2023: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी समाजात द्वेष पसरवणाऱ्या गटांवर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.

Manish Jadhav

Karnataka Assembly Election 2023: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी समाजात द्वेष पसरवणाऱ्या गटांवर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने म्हटल्यानंतर अखिलेश यादव यांचे हे विधान समोर आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकेकाळी आरएसएसवर बंदी घातली होती, असे यादव म्हणाले.

दरम्यान, भाजपवर हल्लाबोल करताना अखिलेश यादव म्हणाले की, महागाई आणि बेरोजगारी शिगेला पोहोचली असून विकास ठप्प झाला आहे. अखिलेश पुढे म्हणाले की, “देशात आणि समाजात द्वेष पसरवणाऱ्या गटांवर बंदी घातली पाहिजे. एकेकाळी, सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसवरही (RSS) बंदी घातली होती.''

दुसरीकडे, काँग्रेसने (Congress) मंगळवारी कर्नाटक निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले की, निवडणुका जिंकल्यानंतर ते बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या गटांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करेल.

विभाजनाची बीजे पेरणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची चौकशी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा काँग्रेसने आग्रह धरला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही "द्वेष पसरवणाऱ्यांविरुद्ध" कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, काँग्रेसने मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये पक्षाने द्वेष पसरवल्याचा आरोप करुन बजरंग दल आणि पीएफआय सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले. त्यावर बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि भाजप (BJP) नेत्यांनी जोरदार हल्ला केला.

त्यानंतर, पंतप्रधान मोदींनी बजरंग दलाचा उल्लेख करताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी बजरंग बलीचा धावा केला. काँग्रेसच्या निषेधार्थ भाजप नेते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज कर्नाटकभर हनुमान चालिसाचे पठण केले.

माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी आज काँग्रेसचा जाहीरनामा जाळला तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेधादरम्यान काँग्रेसचा जाहीरनामा फाडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT