Architect Chandrasekhar Guru Dainik Gomantak
देश

वास्तूतज्ञ चंद्रशेखर गुरु यांची हत्या, चाकूने केले वार

वास्तू तज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची भक्तांच्या वेशात आलेल्या मारेकऱ्यांनी निर्घृण हत्या केली. हल्लेखोर बागलकोट येथील असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

वास्तू तज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची भक्तांच्या वेशात आलेल्या मारेकऱ्यांनी निर्घृण हत्या केली. हल्लेखोर बागलकोट येथील असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

दरम्यान, कर्नाटकातील (Karnataka) एक प्रसिद्ध नाव असलेले चंद्रशेखर गुरुजी सरला वास्तूवर टीव्ही कार्यक्रम करत होते. सरला वास्तूवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे पार्थिव KIMS रुग्णालयात (Hospital) हलवण्यात आले आहे. चंद्रशेखर गुरुजी 2000 हून अधिक चर्चासत्रांमध्ये सहभागी झाले होते. त्यांना 16 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ते सिव्हिल इंजिनिअर होते. विशेष म्हणजे, त्यांनी आर्किटेक्चरमध्ये डॉक्टरेट मिळवली होती.

दुसरीकडे, एसपी लबूराम घटनास्थळी दाखल पोहोचले असून त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे. परंतु गुरुजींची हत्या कोणत्या कारणामुळे झाली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरजवळ गुरुजींवर हल्ला करुन मारेकरी फरार झाले.

तसेच, दोन हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्यावर चाकूने वार करुन तेथून पळ काढल्याची घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हॉटेलमधील कर्मचार्‍यांनी सांगितले की, गुरुजी 2 जुलै रोजी हॉटेलमध्ये आले होते आणि त्यांना 6 जुलै रोजी इथून जायचे होते.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुजी हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये बसले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. सरला जीवन, सरला वास्तू, मानेगागी वास्तू या कार्यक्रमांद्वारे गुरुजी हे कर्नाटकातील घराघरात पोहोचले होते. विशेष म्हणजे, गुरुजी सरला अकादमी चालवत होते.

शेवटी, ग्लोबल व्हिजनचे चेअरमन असलेल्या गुरुजींनी 2016 मध्ये सरला जीवन नावाने इन्फो एंटरटेनमेंट टीव्ही चॅनल सुरु केला होता. त्याचबरोबर 2002 मध्ये सीजी परिवार नावाने एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT