Sanjay Nishad Twitter / ANI
देश

'जेव्हा भाजप चहावाल्याच्या मुलाला पंतप्रधान बनवू शकते...': संजय निषाद

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Elections) सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या आघाडीच्या पक्षांनी प्रचंड बहुमताने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. या निवडणुकीत निषाद पक्षाचे संस्थापक संजय निषाद हे भाजपसोबत (BJP) युती करुन निवडणूकीच्या रिंगणात आहेत. (Sanjay Nishad Said BJP Can Make Chahawala Son Prime Minister Of India)

दरम्यान, यूपी निवडणुकीबाबत ते म्हणाले की, यावेळी आम्ही 300 हून अधिक जागा जिंकू. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपची सत्ता आल्यास मंत्रिपद मिळण्याची शक्यता काय, असे विचारले असता संजय निषाद म्हणाले की, भाजप जेव्हा एका सामान्य चहावाल्याच्या मुलाला पंतप्रधान बनवू शकते, तर पक्ष निषादच्या मुलाला काहीही बनवू शकते.

तसेच, गोरखपूरमध्ये मतदान केल्यानंतर भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला (Shivpratap Shukla) यांनीही या निवडणुकीत भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल असा दावा केला. बलियामधून निवडणूक लढवणारे उत्तर प्रदेश मंत्री आनंद स्वरुप शुक्ला (Anand Swarup Shukla) म्हणाले की, 'राज्यात भाजप आणि योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची लाट आहे. आम्ही 350 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास आहे.'

दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप विक्रम करेल आणि 300 हून अधिक जागा जिंकेल. योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

शिवाय, या टप्प्यात राज्यातील 10 जिल्ह्यांतील 57 विधानसभा जागांवर लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे हा टप्पा विशेष मानला जातो. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली, ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT