उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यातच आता शिवसेना युवा नेते आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उत्तरप्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज उत्तरप्रदेशातील एका रॅलीला संबोधित केले. उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) यावेळी मोठे राजकीय परिवर्तन होणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. (Aditya Thackeray Criticizes The Yogi Government In Uttar Pradesh)
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, ''योगी सरकारने उत्तरप्रदेशातील जनतेची फसवणूक केली आहे. भाजपने प्रचारसभांच्या माध्यमातून फक्त नि फक्त दंगलीच्या गोष्टी प्रचारीत केल्या. मात्र शिवसेनेची राजकीय निती जनतेचा विकास करणे हीच राहीली आहे. मोदी सरकार आणि योगी सरकारने आश्वासनांचा बाजार मांडला आहे. मागील दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकार अत्याचार केला. योगी सरकारने उत्तरप्रदेशात ध्रुवीकरणाशिवाय काहीच केले नाही.''
ते पुढे म्हणाले, ''उत्तरप्रदेशातील नागरीक मुंबईत (Mumbai) मुंबईकर म्हणून गुण्यागोविंदाने राहत आहेत. कोरोना काळात उत्तरप्रदेशासह उत्तर भारतातील नागरिकांना कष्ट सोसावे लागले. उत्तरप्रदेशाकडे चालत जाणाऱ्या नागरिकांना योगी सरकार अन् मोदी सरकारने काहीच मदत केली नाही. दुसरीकडे मात्र कोरोना संकटात उत्तर भारतातील नागरीकांना सोयी सुविधा प्रदान महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. तसेच मोदी सरकारमधील केंद्रीय राज्य गृहमंत्र्यांच्या सुपुत्राने लखीमपूरमधील निष्पाप शेतकऱ्यांना चिरडले.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.