Viral Video Dainik Gomantak
देश

वर्गात रंगला निवडणुकीचा माहौल! समोसा आणि पिझ्झा चिन्हावर निवडणूक; शिक्षकांच्या अनोख्या प्रयत्नांनी मुलं शिकली 'मतदान प्रक्रिया' VIDEO

Student Viral Video: 'हमारा नेता कैसा हो, XYZ भइया जैसा हो!' निवडणुकीच्या काळात आपल्याला असे नारे नेहमीच ऐकू येतात.

Manish Jadhav

Student Viral Video: 'हमारा नेता कैसा हो, XYZ भइया जैसा हो!' निवडणुकीच्या काळात आपल्याला अशा घोषणा नेहमीच ऐकू येतात. मात्र, सध्या अशाच मनोरंजक घोषणा एका वर्गात घुमल्या आहेत. शिक्षकांनी मुलांना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी पूर्णपणे निवडणुकीची थीम तयार केली. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

निवडणूक प्रक्रिया शिकवण्याचा आगळावेगळा फंडा

दरम्यान, या अनोख्या उपक्रमात शिक्षकांनी वर्गात चक्क मतदान केंद्र (Polling Booth) तयार केले. विद्यार्थ्यांनी उमेदवार म्हणून सहभाग घेतला, पोलिंग एजंट्स नेमले गेले आणि विशेष म्हणजे, उमेदवारांनी स्वतः त्यांच्या घोषणा (Slogans) तयार केल्या. उमेदवारांना पतंग, पिझ्झा, स्माईल आणि समोसा अशी मजेदार निवडणूक चिन्हे देण्यात आली. यावेळी वर्गातील सर्व मुलांनी सांकेतिक व्होटर आयडी दाखवून मतदान केले आणि आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडून निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली.

इन्स्टाग्रामवर @master_ji21 या हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. शिक्षकांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, "आम्ही मुलांना सरकार आणि लोकशाही (Democracy) हा विषय शिकवत होतो. त्यासाठी चार उमेदवार उभे केले आणि त्यांना प्रचार करण्यासाठी 4 दिवसांचा वेळ दिला. मुलांनी स्वतः निवडणूक चिन्हे आणि स्लोगन तयार केले. अध्यक्ष आणि पोलीस अधिकारी बनवून मतदान केंद्र (Polling Booth) तयार केले."

'समोसा' चिन्हावर 'सोमेश' विजयी

अखेरीस मतमोजणी झाली आणि सोमेश नावाचा विद्यार्थी (Student) निवडणूक जिंकला. सोमेशचे निवडणूक चिन्ह 'समोसा' होते आणि त्याची विजयी घोषणा होती की, "समोसा दबाओ सोमेश जिताओ." अशा प्रकारे, मंत्र्यांची निवड कशी केली जाते, हे मुलांनी अत्यंत रंजक पद्धतीने शिकून घेतले. या व्हिडिओला एक लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले. शिक्षकांच्या या प्रयत्नाचे अनेकांनी कौतुक केले. एका यूजरने लिहिले की, "प्रत्येक शाळेत अशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे." तर दुसऱ्याने लिहिले, "आदरणीय सोमेश भाई यांना ऐतिहासिक विजयाच्या हार्दिक शुभेच्छा."

मात्र, काही यूजर्संनी गंमतीत प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले, "समोसा देऊन विकत घेतला! हा तर नक्कीच नेता बनेल!" तर दुसऱ्या यूजरने लिहिले, "हे कसलं मतदान आहे, जिथे मारामारीच झाली नाही!" एका यूजरने 'लाल फूल नीला फूल, सोमेश भैया ब्यूटीफुल' अशी स्लोगन दिली. या मिश्किल आणि कौतुकाच्या प्रतिक्रियामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर अधिक चर्चेचा विषय बनला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगला मोठा झटका! कॅनडाने 'दहशतवादी संघटना' म्हणून केले घोषित, संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा

Cricketer Retierment: क्रीडाविश्वात खळबळ! दोन वर्ल्डकप जिंकणाऱ्या 'या' दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

मोपा विमानतळावर पार्किंग शुल्क वाढविल्याने टॅक्सी चालक आक्रमक, बॅरिकेड तोडून प्रशासकीय इमारतीकडे घेतली धाव; परब, सरदेसाईंची CM सोबत बैठक

Goa Cricket Betting: भारत-पाक फायनल सामन्यावर सट्टा, सांकवाळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 लाखांच्या मुद्देमालासह 5 जण ताब्यात

'सरकार दारात नोकरी घेऊन येणार नाही, घरातून बाहेर पडा मुलाखती द्या'; CM सावंतांचे गोमंतकीय तरुणांना आवाहन

SCROLL FOR NEXT