Markets
Markets Twitter / ANI
देश

Holi Celebrations: यूपीच्या बाजार पेठेत मोदींची धून

दैनिक गोमन्तक

यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे रंग आता बाजारातही पाहायला मिळत आहेत. होळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून,अशा स्थितीत राज्यातील बाजारपेठा भाजपच्या रंगात रंगल्या आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजच्या बाजारपेठांमध्ये 'पीएम मोदी मास्क', गुलाल आणि पिचकारीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. 'पीएम मोदी मास्क' लोकांना सर्वाधिक आवडला असून त्याला मागणीही वाढली आहे. एका दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, "मोदी मास्कची मागणी जास्त असून त्याची विक्रीही प्रंचड प्रमाणात वाढली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावेळी व्यवसाय चांगला चालला आहे." (Sales of PM Modi masks have increased in the markets of Prayagraj in Uttar Pradesh)

वास्तविक, कोरोनामुळे दोन वर्षांपासून लोकांना होळीचा सण सार्वजनिकरित्या साजरा करता आलेला नाही. दोन वर्षांपासून कडक बंदोबस्तात होळी साजरी केली जात होती. परंतु यंदा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्ययाचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही नुकतेच आले आहेत. ज्यामध्ये भाजपने पुन्हा एखदा आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत प्रयागराजच्या बाजारपेठेत खास प्रकारचे अ‍ॅटमायझर आणि मास्क विकले जात आहेत.

होळी कधी

यंदा होळीचा सण 18 मार्च रोजी येत आहे. वास्तविक होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होते. फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 17 मार्च रोजी आहे. दुसरीकडे, होलिका दहनाच्या दुसऱ्याच दिवशी रंगांची उधळण केली जाते. लोक एकमेकांना रंग लावतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT