जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (JNU) बाहेर भगवे झेंडे आणि अनेक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ज्यावर 'भगवा JNU' असे लिहिले आहे. हे झेंडे आणि पोस्टर्स जेएनयूच्या बाहेरील रस्त्यावर आणि मुख्य गेटजवळ लावण्यात आले आहेत. ते हिंदू सेनेने लावले आहेत. अलीकडे जेएनयूमध्ये रामनवमीच्या दिवशी डाव्या विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP) यांच्यात हिंसाचार झाला होता. ज्यामध्ये अनेक विद्यार्थी (Student) जखमी झाले होते. या हिंसाचारानंतर आज जेएनयूबाहेर हे पोस्टर्स आणि झेंडे लावण्यात आले आहेत. Saffron flags and several posters have been put up outside Jawaharlal Nehru University
दरम्यान, याप्रकरणी हिंदू सेनेचे उपाध्यक्ष सुरजित यादव यांचे वक्तव्यही आले आहे. ज्यात त्यांनी जेएनयूमध्ये विरोधकांकडून भगव्याचा अपमान केल्याचे म्हटले आहे. या लोकांनी सुधारावे... भगवा अंगीकारण्याचा प्रयत्न करु नका. आम्ही तुमचा आदर करतो. प्रत्येक धर्माचा आणि विचारांचा आदर करा. भगव्या रंगाचा अपमान केला जात आहे. हिंदू सेना सहन करणार नाही. या घटनेबाबत दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी म्हणाले की, ''आज सकाळी जेएनयूजवळील रस्त्यावर आणि आसपासच्या परिसरात काही झेंडे आणि बॅनर लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नुकत्याच घडलेल्या घटना लक्षात घेऊन ते तात्काळ हटवण्यात आले असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.''
मांसाहारावरुन हिंसाचार झाला
रामनवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील कावेरी वसतिगृहात मांसाहार बंदी वरुन हिंसाचार झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी वसतिगृहात येऊन मेस कर्मचाऱ्यांना मांसाहार करण्यापासून रोखले आणि तिथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला होता. त्याचवेळी, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त होणारी पूजा थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभाविपच्या सदस्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. जेएनयूएसयू, एसएफआय आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने एबीव्हीपीशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान आज जेएनयूबाहेर हे पोस्टर्स आणि झेंडे पाहायला मिळाले आहेत. जेएनयूच्या मुख्य गेटपासून ते बाहेरील रस्त्यापर्यंत ते लावण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.