Sachin Tendulkar Masai Mara trip Dainik Gomantak
देश

Viral Video: 'क्रिकेटचा देव' थोडक्यात बचावला, जंगलात मदतीची वाट पाहत बसला; सचिनसोबत नेमकं घडलं काय? पाहा व्हिडिओ

Sachin Tendulkar Masai Mara trip: निवृत्तीनंतर जगभर फिरण्याचा आनंद घेत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Sameer Amunekar

मुंबई: निवृत्तीनंतर जगभर फिरण्याचा आनंद घेत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शांततेसाठी आणि संयमासाठी प्रसिद्ध असलेला सचिन प्रवासातही त्याच गुणांचा प्रत्यय देताना दिसला. सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत केनियातील मसाई माराला भेट देण्यासाठी गेला होता. त्या प्रवासातील एक रोमांचक आणि तितकाच आव्हानात्मक अनुभव त्याने शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, मसाई मारावरून उड्डाण करताना विमान वादळात अडकलं. दूरवरून त्याला प्रचंड पावसाचे आणि काळ्या ढगांचे दर्शन झाले. खराब हवामानामुळे विमान दोनदा लँड होऊ शकले नाही, ज्यामुळं विमानात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अखेर काही वेळानंतर धावपट्टी मोकळी झाल्यानंतर विमान सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला उतरवण्यात आलं.

परंतु, त्यांचा त्रास तिथेच संपला नाही. पावसामुळे सचिन, त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर काही काळ जंगलातच अडकले होते. मदत पोहोचेपर्यंत त्यांना जंगलात थांबावे लागले. या संपूर्ण अनुभवाबाबत सचिनने चाहत्यांना व्हिडिओ शेअर करत माहिती दिलीय.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सचिन तेंडुलकर वेगळ्याच कारणाने चर्चेत होता. तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) पुढचा प्रमुख होऊ शकतो अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये समोर आल्या होत्या.

मात्र, सचिनने या वृत्तांचे खंडन केले आहे. एका निवेदनात सचिननं स्पष्ट केलं की, “ही केवळ अफवा आहे. यामध्ये कोणताही तथ्य नाही. कृपया अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT