राज्याच्या निवडणुकीत पक्षाचे पुनरागमन सुनिश्चित करण्यासाठी "विलंब न करता" राजस्थानचा मुख्यमंत्री बनवण्याची मागणी काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी सोनिया गांधींकडे केली आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही देण्यात आली आहे. तसे झाले नाही तर राजस्थानमध्येही (Rajasthan) पंजाबप्रमाणेच काँग्रेसचा (Congress) पराभव होऊ शकतो. तिथे चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना मुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला अखेर फोल ठरला, असे सचिन पायलट यांनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना सांगितले आहे. (Sachin Pilot has demanded the Congress party to make him the Chief Minister)
गेल्या काही आठवड्यात सचिन पायलट आणि गांधी कुटुंबींयामध्ये तीन बैठका झाल्या आहेत. राजस्थानमध्ये डिसेंबर 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. परंतु उशीर झाल्यास पंजाबमधील परिस्थितीची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल, असे पायलट यांनी हायकमांडला सांगितले आहे.
यापूर्वी सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री होते. परंतु 2020 मध्ये त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्याने त्यांना दोन्ही पदे गमवावी लागली. गेल्या दोन वर्षांत काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला. राहुल गांधींच्या निकटवर्तीयांचा विचार केला तर आता फक्त सचिन पायलटच उरले आहेत. कारण ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद आणि आरपीएन सिंह यांसारखे नेत्यांनी भाजपची वाट धरली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.