राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 
Dainik Gomantak
देश

RSS नेत्याचे फारुख अब्दुल्लांवर टीकास्त्र, देश सोडून जाण्याचा दिला सल्ला

फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी यापूर्वी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करण्यासाठी चीनची मदत घेतली जाईल असे सांगितले होते. आपण ते स्वीकारावे का? कधीच नाही.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले होते की, जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) लोकांना त्यांचे हक्क परत मिळवण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांप्रमाणे 'त्याग' करावा लागेल. यावर आता संघाच्या नेत्याने अब्दुल्ला यांच्या विधानावर खिल्ली उडवली त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. इंद्रेश कुमार म्हणाले, फारुख अब्दुल्ला हे शांततेपेक्षा हिंसाचाराला प्राधान्य देतात. अब्दुल्ला यांना भारतात गुदमरल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी देश सोडून जगाच्या कोणत्याही भागात जावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांची खोटं बोलण्याची फॅशन

केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या कथित दडपशाहीविरोधात राष्ट्रीय राजधानीत निदर्शने करणाऱ्या पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यावरही आरएसएस नेत्याने हल्ला चढवला. आरएसएस नेत्याने मुफ्ती यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप करत म्हटले की, ही त्यांची फॅशन बनली आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन्ही नेत्यांनी चिथावणी देण्यारे राजकारण थांबविले पाहिजे. त्यामुळे देशाची एकता आणि अखंडता राखण्यात अडसर येत आहे.

आरएसएस नेता म्हणाले, फारुख अब्दुल्ला यांनी यापूर्वी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करण्यासाठी चीनची मदत घेतली जाईल असे सांगितले होते. आपण ते स्वीकारावे का? कधीच नाही. इथे गुदमरल्यासारखं वाटत असेल, तर ते अरब किंवा अमेरिकेला वाटेल तिथे जातात. त्यांची पत्नी इंग्लंडमध्ये राहते, तिथे जाऊन पत्नीसोबत राहण्याचाही विचार ते करू शकतात. ते आनंदी होतील. अब्दुल्ला यांनी रविवारी म्हटले होते की, जम्मू-काश्मीरमधील लोकांना विशेष दर्जा बहाल करण्यासाठी शेतकऱ्यांप्रमाणे त्याग करावा लागेल.

नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त श्रीनगरमधील नसीमबाग येथे पक्षाच्या युवा शाखेच्या अधिवेशनाला संबोधित करताना अब्दुल्ला बोलत होते. आमचा पक्ष हिंसेचे समर्थन करत नाही. केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या कथित दडपशाहीच्या निषेधार्थ मुफ्ती यांनी जंतरमंतर येथे धरणे आंदोलन केले. निरपराधांची हत्या त्वरित थांबवावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT