IT Raid: आयकर विभागाच्या पथकाने ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये शोध मोहिम राबवत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. झडतीदरम्यान, आयकर अधिकार्यांनी कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या रूपात मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त केले आहेत.
यात देशी दारूच्या बेहिशेबी विक्रीच्या नोंदी, अघोषित रोख पावत्या आणि बेहिशेबी रोख व्यवहारांचे तपशील उघड झाले आहेत.
देशी दारू निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या एका ग्रुपच्या परिसरात आयकर विभागाने शोध आणि जप्तीची कारवाई केली. हा गट धान्यावर आधारित दारू, विदेशी दारूची बाटली भरणे, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था चालवणे इत्यादी काम करत होता.
6 डिसेंबर रोजी या ऑपरेशन अंतर्गत, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील 10 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 30 हून अधिक ठिकाणांवर शोध घेण्यात आला.
या संपूर्ण शोध मोहिमेबाबत प्राप्तिकर विभागाने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, झडतीदरम्यान जप्त केलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणात देशी दारूची बेहिशेबी विक्री, अघोषित रोख पावतींचे तपशील आणि बेहिशेबी रोखीच्या व्यवहारांचे संदर्भ उघड झाले आहेत.
या समूहाच्या व्यवसायावर झारखंडमधील रांची येथील एका कुटुंबाचे नियंत्रण आहे. या ग्रुपशी संबंधित कुटुंबातील एक सदस्य हा रांचीमध्ये राहणारा राजकारणाशी संबध असलेला व्यक्ती आहे.
दारूच्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर लपवण्यात आले आहे, असे शोध मोहिमेदरम्यान उघडकीस आलेल्या माहितीमधून दिसून येते. शोध मोहिमेदरम्यान, तेथून 351 कोटी रुपयांची अघोषित रोकड देखील जप्त करण्यात आली आणि तेथून 2.80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बेहिशेबी दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
जप्त करण्यात आलेला रोख रकमेचा मोठा हिस्सा सुमारे रु. 329 कोटी रुपये ओडिशातील विविध ठिकाणी लपविण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.