Rohit Sharma Gym Video Dainik Gomantak
देश

Rohit Sharma: 2027 च्या विश्वचषकासाठी 'मुंबईचा राजा'ची दमदार तयारी, जीममध्ये करतोय मेहनत Video Viral

Rohit Sharma Gym Video: मुंबईचा राजा रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०२७ च्या विश्वचषकासाठी त्याची दमदार तयारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Sameer Amunekar

Rohit Sharma Viral Gym Video

मुंबईचा राजा रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०२७ च्या विश्वचषकासाठी त्याची दमदार तयारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर रोहितचा जीममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ३८ वर्षीय अनुभवी फलंदाजाचा हा फिटनेस सेशन पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. रोहितच्या मेहनतीतून स्पष्ट दिसते की तो आगामी विश्वचषकासाठी स्वतःला परिपूर्ण तंदुरुस्त करण्याच्या तयारीत आहे.

अलिकडच्या काळात रोहितने लक्षणीय वजन कमी केले असून त्याचा प्रभाव त्याच्या फिटनेसवर दिसून येतो. कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याचे संपूर्ण लक्ष एकदिवसीय क्रिकेटकडे आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो पुन्हा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या मालिकेसाठी त्याने बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) हँडलवर २१ सप्टेंबर रोजी एक व्हिडिओ शेअर केला. त्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल दोघेही जिममध्ये सराव करताना आणि नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसतात.

बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले की,"आगामी स्पर्धांसाठी तयारी करण्यासाठी, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सराव केला."

२०२३ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. ती निराशा अजूनही चाहत्यांच्या मनात ताजी आहे. त्यामुळेच २०२७ च्या दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देण्याचा निर्धार रोहितने केला आहे. त्याने अनेक मुलाखतींमध्ये याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे की, तो शेवटपर्यंत लढेल आणि टीम इंडियाला पुन्हा गौरव मिळवून देईल.

आता चाहत्यांची नजर त्याच्या या तयारीकडे आहे. रोहितचा जिम वर्कआउट आणि नेट सराव पाहून क्रिकेटप्रेमींची खात्री पटली आहे की "हिटमॅन" २०२७ मध्येही आपल्या जोरदार कामगिरीने विश्वचषक गाजवायला सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोकण रेल्वेची मोठी कारवाई! 2025 मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 20.27 कोटींचा दंड वसूल

Plane Crash: ओडिशात विमान अपघात! राउरकेला-भुवनेश्वर चार्टर्ड विमान कोसळलं; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, 6 जखमी

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT