Rohit Sharma Tweet Viral Dainik Gomantak
देश

Rohit Sharma Tweet Viral: जर्सी नंबरचं कनेक्शन! शुभमन गिलकडे नेतृत्व येताच रोहितचं '13 वर्षांपूर्वीचं' ट्विट चर्चेत, म्हणाला होता...

Rohit Sharma Viral Tweet: शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवल्यापासून, रोहित शर्माचे जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sameer Amunekar

बीसीसीआयने शनिवारी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली. या निवडीदरम्यान एक मोठा आणि अनपेक्षित बदल करण्यात आला. रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून, त्याच्या जागी तरुण फलंदाज शुभमन गिल याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात मोठी चर्चा रंगली असून, सोशल मीडियावरही याच विषयावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

४ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या या संघात एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही संघांचा समावेश आहे. मात्र, सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वात झालेला बदल. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

गिलच्या कर्णधारपदाच्या घोषणेनंतर रोहित शर्माचं १३ वर्षांपूर्वीचं ट्विट सोशल मीडियावर पुन्हा समोर आलं आहे. त्या ट्विटमध्ये रोहितनं लिहिलं होतं, “A new era begins (77), as another (45) ends.” म्हणजेच “एक युग (४५) संपले, आणि एक नवीन युग (७७) सुरू झाले.” योगायोग असा की, रोहितचा जर्सी क्रमांक ४५ आहे, तर शुभमन गिलचा क्रमांक ७७ आहे. या ट्विटचा संदर्भ पाहता क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलाच उत्साह आणि चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

यावर अनेकांनी सोशल मीडियावर टिप्पणी करत म्हटलं की, “१३ वर्षांपूर्वी रोहितनेच शुभमनच्या नेतृत्वाचा इशारा दिला होता का?” तर काहींनी हे निव्वळ योगायोग असल्याचं मत मांडलं. तरीदेखील हे ट्विट सध्या ट्विटर (X) आणि इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार ठेवणे कठीण आहे. सध्या आमचं मुख्य लक्ष टी-२० विश्वचषकावर केंद्रित आहे. एकदिवसीय फॉरमॅट तुलनेने कमी खेळला जातो, त्यामुळे आम्हाला युवा खेळाडूंना संधी देण्याची गरज होती. गिलमध्ये आम्हाला पुढील पिढीचा कर्णधार दिसतो आणि त्याला आता जबाबदारीची सवय व्हावी, म्हणून हा निर्णय घेतला आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT