Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story
एकीकडे टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका रंगली आहे, तर दुसरीकडे भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या खासगी आयुष्याच्या आठवणींमध्ये रमलेला दिसतो आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या 'हिटमॅन'ने अलीकडेच माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सहभागी होताना रोहितने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोड आठवणींना उजाळा दिला. त्याने पत्नी रितिका सजदेहसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधला.
शोमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी रितिका सजदेहही उपस्थित होती. याच मंचावर रोहितने त्याच्या प्रेमकथेचे अनेक अनोळखी पैलू उलगडले आहेत. रितिकाला प्रपोज करण्याचा क्षण, त्यांचा सुरुवातीचा प्रवास, आणि मैत्रीतून प्रेमात झालेला बदल याबाबत सर्वकाही त्यानं शेअर केलं आहे.
रोहितने सांगितले की त्याने रितिकाला प्रपोज करण्यासाठी असं ठिकाण निवडलं जिथे त्याने क्रिकेटचा प्रवास सुरू केला होता. त्याने रितिकाला खास प्लॅननुसार फिरवून त्या मैदानावर आणले. "ती माझ्यासाठी जेवण घेऊन आली होती. आम्ही जेवलो आणि मी तिला आईस्क्रीमसाठी घेऊन निघालो. पण मी तिला थेट मैदानावर घेऊन गेलो. माझ्या मित्रांना आधीच सजावट करण्यास सांगितलं होतं," असं रोहित म्हणाला.
"मैदानात अंधार होता. मी गाडी मैदानाच्या मध्यभागी पार्क केली, आणि मग मैदानातच गुडघ्यावर बसून मी तिला प्रपोज केलं," असा रोहितनं यावेळी बोलताना सांगितलं.
रितिकाशी त्याची पहिली भेट २००८ मध्ये झाली होती. मात्र, रोहितच्या म्हणण्यानुसार, २०१३ मध्येच त्याला उमजलं की ही केवळ मैत्री नाही. "ती माझ्यासाठी नेहमी घरचं जेवण आणायची कारण मला हॉटेलचं जेवण आवडायचं नाही. तेव्हा आम्हाला दोघांनाही जाणवलं की ही मैत्री नसून काहीतरी जास्त आहे," असंही रोहितने स्पष्ट केलं.
ही प्रेमकथा केवळ क्रिकेटप्रेमींनाच नव्हे, तर प्रत्येक रोमँटिक व्यक्तीला भावणारी आहे. मैत्रीच्या पायावर उभं राहिलेलं हे नातं आज एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. रोहित-रितिकाची ही कथा नव्या पिढीला नात्यांची किंमत आणि स्थैर्याचं महत्त्व शिकवणारी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.