Goa Tourist Attack: "मदतीसाठी ओरडत होतो, कोणीच आलं नाही", गोव्यात दिल्लीच्या पर्यटकांना ऑटोचालकाकडून बेदम मारहाण; शेअर केला धक्कादायक अनुभव

Goa Tourism Safety: उत्तर आणि दक्षिण गोव्यात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात, मात्र अलीकडे काही घटनांमुळे गोव्यातील सार्वजनिक सुरक्षेविषयी चिंता वाढली आहे.
Goa Tourist Attack
Goa Tourist AttackDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात सध्या पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात, मात्र अलीकडे काही घटनांमुळे गोव्यातील सार्वजनिक सुरक्षेविषयी चिंता वाढली आहे. अलीकडेच दिल्लीहून आलेल्या एका पर्यटकाने आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

२३ वर्षीय पर्यटकाने सांगितले की, १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो आपल्या धाकट्या भावासह एका भाड्याच्या स्कूटरवरून उत्तर गोव्याला दक्षिण गोव्याशी जोडणाऱ्या पुलावरून प्रवास करत होता.

पुलावर वाहतूक कोंडी झाली असताना, एका स्थानिक ऑटोचालकाने हॉर्न वाजवण्यास सुरूवात केली आणि पर्यटकाला जागा नसतानाही त्या ऑटोचालकने वाहन हलवण्यास सांगितले.

Goa Tourist Attack
Goa Cabinet: दिगंबर कामतांचे मंत्रिपद नक्की? दिल्लीत ठरणार यादी; इतर नावांविषयी वाढली उत्कंठा

पर्यटकानं दुर्लक्ष केल्यामुळे ऑटोचालक संतापला आणि एका स्थानिक व्यक्तीच्या मदतीने पुलावर त्यांची स्कूटर थांबवण्यात आली. त्यानंतर ऑटोचालकाने शिवीगाळ करत त्याच्या भावावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार थांबवण्यासाठी पर्यटकाने हस्तक्षेप केला असता, त्याच्यावर थेट हल्ला करण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना पुलावर भरदिवसा घडली असूनही आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी कोणतीही मदत केली नाही. आम्ही जोरजोरात मदतीसाठी ओरडत होतो, पण कोणीही पुढे आलं नाही. आम्ही जवळच्या वाहतूक पोलिसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनीही मदतीसाठी पुढे येण्याची तसदी घेतली नाही. अखेर तो ड्रायव्हर पळून गेला," असेही पर्यटकाने सांगितले.

या घटनेनंतर पर्यटकाने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करत इतर पर्यटकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्याने म्हटलं की, गोव्यात रस्त्यांवर आणि पुलांवर प्रवास करताना विशेषत: स्थानिक वाहनचालकांशी वाद टाळा. परिस्थिती कधीही बिघडू शकते.

Goa Tourist Attack
80 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, दुसऱ्यावेळा बलात्काराच्या तयारीत असतानाच पकडले; '50 वर्षीय' आरोपीला 4 दिवसांची कोठडी

गोवा पर्यटनासाठी असुरक्षित?

ही घटना उघडकीस आल्यानंतर गोव्यातील पर्यटन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा गोव्याची एक सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून ओळख धोक्यात येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com