Rohit Sharma, Sachin Tendulkar Dainik Gomantak
देश

IND vs PAK: रोहित पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचणार! फक्त 4 षटकार अन् सचिनचा 'तो' अनब्रेकेबल रेकॉर्ड मोडणार

Rohit Sharma: रोहितला महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडण्याची संधी असेल.

Sameer Amunekar

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ओळखलं जातं. रोहित फॉर्ममध्ये असतो, तेव्हा कोणत्याही गोलंदाजासाठी त्याला रोखणं सोपं काम नसतं. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रोहितच्या फलंदाजीदरम्यानही ही झलक दिसून आली.

रोहित बांगलादेशविरुद्ध ३६ चेंडूत ४१ धावा केल्या. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे, जर त्याने चांगली कामगिरी केली तर टीम इंडियाचा विजय जवळजवळ निश्चित होईल. या सामन्यात रोहितला महान भारतीय फलंदाज असेल.

भारतीय संघ २३ फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान संघाविरुद्ध ग्रुप अ मधील दुसरा सामना खेळेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावरही असतील. रोहितने पहिल्या सामन्यातच दमदार फलंदाजी केली होती.

रोहित पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करेल. जर रोहितने या सामन्यात चार षटकार मारले तर तो एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारताचा खेळाडू बनेल.

सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे ज्याने पाकिस्तानविरुद्ध ६९ एकदिवसीय सामने खेळताना एकूण २९ षटकार मारले आहेत. या यादीत रोहित २६ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

रोहित शर्माचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धचा विक्रम चांगला आहे, ज्यामध्ये त्याने १९ सामन्यांमध्ये ५१.३५ च्या सरासरीने ८७३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट ९२.३८ आहे.

रोहित एकदिवसीय सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणून ९००० धावा पूर्ण करण्यापासून फक्त एक धाव दूर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला हा आकडा गाठण्याची संधी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

सांगेत 14 वर्षांपासून जीवघेण्या लाकडी पुलावर धोकादायक प्रवास; आदिवासी बांधवांची व्यथा दुर्लक्षित!

IND vs ENG: रेकॉर्डब्रेकर गिल! मँचेस्टरमध्ये शुभमन करणार मोठा धमाका; 19 वर्ष जुना रेकॉर्ड निशाण्यावर

Ishan Kishan Dance Video: 'सॉरी सॉरी' गाण्यावर इशान किशनचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'वाह क्या बात है...'

Kerala Temple Crocodile: मंदिराचे रक्षण करणारी, प्रसाद खाऊन राहणारी 'मगर'; केरळच्या श्रीअनंत पद्मनाभ मंदिरातील अद्भुत गोष्ट

SCROLL FOR NEXT