Rohit Sharma Lamborghini Urus Car Dainik Gomantak
देश

Rohit Sharma Lamborghini Urus: 'मुंबईच्या राजा'ने खरेदी केली नवीकोरी Lamborghini, '3015' नंबर प्लेट चर्चेत; किंमत किती?

Rohit Sharma Lamborghini Urus Car: भारताचा स्टार क्रिकेटर आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा केवळ मैदानावरील कामगिरीसाठीच नाही तर आलिशान गाड्यांच्या शौकीनपणासाठीसुद्धा ओळखला जातो.

Sameer Amunekar

भारताचा स्टार क्रिकेटर आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा केवळ मैदानावरील कामगिरीसाठीच नाही तर आलिशान गाड्यांच्या शौकीनपणासाठीसुद्धा ओळखला जातो. त्याच्या गॅरेजमध्ये आधीच कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांचा ताफा आहे. आता या ताफ्यात आणखी एक भव्य गाडीची भर पडली आहे. रोहितने दुसऱ्यांदा लॅंबॉर्गिनी खरेदी केली असून यावेळी त्याने लॅंबॉर्गिनी उरुस (Lamborghini Urus SE) या अत्याधुनिक आणि दमदार एसयूवीची निवड केली आहे.

ही गाडी हायब्रिड पॉवरट्रेनसह येते आणि लक्झरीसोबत उच्च दर्जाची परफॉर्मन्स देणारी म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही एसयूवी एका डीलरशिपच्या बाहेर दिसत आहे.

गाडीचा रंग आकर्षक नारंगी (Arancio Argos) असून, डीलरशिपमध्ये ती मोठ्या उत्साहात सर्वांसमोर सादर करण्यात आली. मात्र, रोहितने स्वतः गाडीची डिलिव्हरी घेतल्याचे कोणतेही अधिकृत फोटो अद्याप समोर आलेले नाहीत.

या नव्या लॅंबॉर्गिनी उरुस SE ची किंमत सुमारे 4.57 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, रोहितचा फॅमिली मॅन असलेला स्वभाव या गाडीच्या नंबर प्लेटवरूनही दिसून येतो. नंबर प्लेटची निवड त्याने आपल्या दोन्ही मुलांच्या जन्मतारखांवरून केली आहे.

रोहितची मुलगी समायरा हिचा जन्म ३० डिसेंबर २०१८ रोजी झाला, तर मुलाचा जन्म १५ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला. या दोन्ही खास तारखांचा संगम त्याच्या नव्या गाडीच्या नंबर प्लेटवर दिसतो, जे त्याच्या कुटुंबावरील प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे.

रोहित शर्माची ही नवीन खरेदी पुन्हा एकदा त्याच्या स्टायलिश आणि लक्झरीयस लाइफस्टाइलची झलक दाखवते, तर चाहत्यांसाठी ही एक चर्चेची नवीच कारण ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Decision: गेम चेंजर निर्णय! हरमनप्रीतने सांगितला 'तो' एक क्षण, ज्यामुळे टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप' चॅम्पियन

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

Goa Today's News Live: कोकणीचे प्रमाणीकरण करण्याची घाई करु नये; नरेंद्र सावईकर

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

SCROLL FOR NEXT