
पणजी: ‘पद्मभूषण डॉ. मनोहर पर्रीकर स्मृती’ ५६व्या गोवा राज्य ॲथलेटिक स्पर्धेत आरसीसी पेडे संघाच्या साक्षी कोलेकर हिने दुहेरी किताब साधताना महिलांच्या १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत बाजी मारली, तर पुरुषांच्या स्प्रिंटमध्ये आरसीसी फातोर्डा संघाचा मोझेस मास्कारेन्हास वेगवान ठरला.
स्पर्धा बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला. २० वर्षांखालील मुलींत आरसीसी पेडेच्या राणी डेगवेकर हिने, तर १८ वर्षांखालील मुलांत पेडे संघाच्याच निकेत चोडणकर याने ‘डबल’ धमाका साधला. त्यांनी अनुक्रमे १०० मीटर व २०० मीटर शर्यतीत अव्वल क्रमांक प्राप्त केला.
साक्षी कोलेकर हिने महिलांची १०० मीटर स्प्रिंट १३.०९ सेकंदात जिंकली, तर २०० मीटर शर्यतीत तिने २६.८२ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या शर्यतीत मोझेस व आरसीसी बांबोळीचा अनंतकृष्णन पिल्लई यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. १०० मीटरमध्ये मोझेस याने १०.६६ सेकंद वेळेसह सुवर्ण, तर अनंतकृष्णन १०.९८ सेकंद वेळेसह रौप्यपदक पटकावले. २०० मीटर शर्यतीत या दोन्ही धावपटूंच्या पदक रंगात अदलाबदल झाली. अनंतकृष्णन २२.३३ सेकंद वेळेस सुवर्णपदकाचा, तर मोझेस २२.६७ सेकंद वेळेसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
निकाल (अनुक्रमे पहिले तीन स्पर्धक) ः पुरुष ः १०० मीटर ः मोझेस मास्कारेन्हा (फातोर्डा, १०.६६ सेकंद), अनंतकृष्णन पिल्लई (बांबोळी, १०.९८ सेकंद), सूरज भाईडकर (पेडे, ११.५१ सेकंद), २०० मीटर ः अनंतकृष्णन पिल्लई (बांबोळी, २२.३३ सेकंद), मोझेस मास्कारेन्हास (फातोर्डा, २२.६७ सेकंद), सूरज भाईडकर (पेडे, २३.४७ सेकंद), ४०० मीटर ः आग्नेल कार्व्हालो (फातोर्डा, ५३.६२ सेकंद), अग्नेश प्रभुदेसाई (श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय-काणकोण, ५८.१ सेकंद), रोहित दास (बांबोळी, ५८.१४ सेकंद).
महिला ः १०० मीटर ः साक्षी कोलेकर (पेडे, १३.०९ सेकंद), ऋचा दळवी (बांबोळी, १३.४४ सेकंद), राशी हळर्णकर (बांबोळी, १४.२ सेकंद), २०० मीटर ः साक्षी कोलेकर (पेडे, २६.८२ सेकंद), ऋचा दळवी (बांबोळी, २८.०७ सेकंद), राशी हळर्णकर (बांबोळी, २९.८४ सेकंद), ४०० मीटर ः श्वेता कास्तान्हा (फातोर्डा, १ मिनिट १६.८४ सेकंद), फ्रीडा वाझ (फातोर्डा, १ मिनिट २१.८८ सेकंद).
२० वर्षांखालील मुलगे ः १०० मीटर ः रीगन कार्दोझ (फातोर्डा, ११.३३ सेकंद), एल्ड्रिज फर्नांडिस (बांबोळी, ११.३६ सेकंद), अँजस भरुचा (पेडे, ११.६१ सेकंद), २०० मीटर ः एल्ड्रिज फर्नांडिस (बांबोळी, २३.३६ सेकंद), रीगन कार्दोझ (फातोर्डा, २३.५ सेकंद), सिधान वाड्डी (फोंडा, २४.१९ सेकंद), ४०० मीटर ः यश गावकर (फोंडा, ५१.८९ सेकंद), पार्थ मसूरकर (पेडे, ५५.२१ सेकंद), सुफियान बालबट्टी (बांबोळी, ५५.२४ सेकंद).
२० वर्षांखालील मुली ः १०० मीटर ः राणी डेगवेकर (पेडे, १३.६९ सेकंद), अनिशा सावनूर (धेंपे महाविद्यालय-मिरामार, १३.९२ सेकंद), अशिता सिजी (बांबोळी, १५.३५ सेकंद), २०० मीटर ः राणी डेगवेकर (पेडे, २८.३१ सेकंद), अनिशा सावनूर (धेंपे महाविद्यालय-मिरामार, २९.७ सेकंद), दिव्या पाटील (पेडे, ३१.३८ सेकंद), ४०० मीटर ः रिद्धी सावंत (पेडे, १ मिनिट १०.७७ सेकंद), नेहा वेळीप (श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय-काणकोण, १ मिनिट २९.९० सेकंद), सुवानी गावकर (श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय-काणकोण, १ मिनिट ३४.६० सेकंद).
१८ वर्षांखालील मुलगे ः १०० मीटर ः निकेत चोडणकर (पेडे, ११.४ सेकंद), जेडन फर्नांडिस (फातोर्डा, फातोर्डा, ११.६३ सेकंद), रोहान खान(श्री भूमिका उच्च माध्यमिक, ११.६६ सेकंद), २०० मीटर ः निकेत चोडणकर (पेडे, २३.३५ सेकंद), जय कुंकळकर (बांबोळी, २३.८ सेकंद), प्रोसेन मोंडल (इन्फंट जेझूस हायस्कूल-कोलवा, २३.९२ सेकंद), ४०० मीटर ः रेहान छप्परबंद (पेडे, ५२.२५ सेकंद), जय कुंकळकर (बांबोळी, ५२.५९ सेकंद), वंश नाईक (सांगे सरकारी उच्च माध्यमिक, ५७.२९ सेकंद).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.