Rohit Sharma  Dainik Gomantak
देश

Ind vs Aus 2nd ODI: सचिन-विराटलाही जमला नाही 'तो' कारनामा केला, चौकार मारुन रचला इतिहास; कांगारुंच्या भूमीवर हिटमॅनचा रेकॉर्डब्रेक फॉर्म VIDEO

Rohit Sharma Record: रोहितने प्रत्येकी एक शानदार चौकार मारुन धावांच्या गतीला वेग दिला. याच दरम्यान, रोहित शर्माने एक मोठा आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.

Manish Jadhav

Rohit Sharma Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरला, तर ऑस्ट्रेलियाने जोश फिलिप, नॅथन एलिस आणि मॅथ्यू कुहनेमन यांच्या जागी ॲलेक्स कॅरी, झेवियर बार्टलेट आणि ॲडम झम्पा यांना संधी दिली. नाणेफेक हारल्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल ही सलामीची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली.

रोहित शर्माने रचला इतिहास

पहिल्या दोन षटकांमध्ये दोन्ही फलंदाजांनी सावधपणे खेळत धावांचा वेग मंद ठेवला. पण तिसऱ्या षटकात गिल आणि रोहितने प्रत्येकी एक शानदार चौकार मारुन धावांच्या गतीला वेग दिला. याचदरम्यान, रोहित शर्माने एक मोठा आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.

रोहितने आपला पहिला चौकार मारताच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचा मोठा टप्पा गाठला. हा विक्रम साधणारा रोहित शर्मा भारताचा पहिला फलंदाज ठरला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करता आल्या नाहीत, पण 'हिटमॅन' रोहित शर्माने हा पराक्रम करुन दाखवला.

विक्रमांच्या यादीत रोहित अग्रस्थानी

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आता अव्वल स्थानी पोहोचला.

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा (भारतीय फलंदाज):

  1. रोहित शर्मा: 1000+ धावा

  2. विराट कोहली: 802 धावा

  3. सचिन तेंडुलकर: 740 धावा

  4. एम.एस. धोनी: 684 धावा

  5. शिखर धवन: 517 धावा

रोहित शर्माची (Rohit Sharma) ही खेळी आणि त्याने केलेला हा विक्रम भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात सात दिवसांत चार अल्‍पवयीनांची अपहरणे, एका प्रकरणाचा छडा; तीन तपासाविना प्रलंबित

Education: भारतीय विद्यार्थ्यांचा कल करिअर केंद्रित शिक्षणाकडे, लंडनमधील विद्यापीठाचा परदेशातील शिक्षणाबाबत अहवाल

Delhi Blast: "दिल्लीतील स्फोट आम्हीच केला..." पाकिस्तानी नेत्याची जाहीर कबुली Watch Video

Goa Metro: गोव्यात 'मेट्रो सेवा' सुरू करा! केंद्रीय मंत्र्यांची सूचना; हैदराबाद येथील बैठकीत सविस्तर चर्चा

Sanguem: जुन्‍या पुलावर टँकर अडकताच नव्‍या पुलाचे 'धाडसी उद्‌घाटन', वाहतूक कोंडीमुळे चालकांचा सुटला संयम; सांगेतील प्रकार

SCROLL FOR NEXT