Champions Trophy 2025 Dainik Gomantak
देश

IND vs BAN: 'हिटमॅन'ची ऐतिहासिक कामगिरी, क्रिकेटच्या देवाला मागे टाकत केला 'हा' खास विक्रम

Champions Trophy 2025: २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

Sameer Amunekar

Rohit Sharma 11000 ODI runs

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं इतिहास रचला. त्यानं क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरला मागे टाकत मोठा विक्रम केला आहे.

रोहित शर्मा ११००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद खेळाडू ठरला. रोहितने हा टप्पा गाठण्यासाठी २६१ डाव ​​घेतले. या यादित विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने फक्त २२२ डावांमध्ये ११००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या आहेत.

रोहितने भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरला मागं टाकलं आहे. सचिनने हा पराक्रम करण्यासाठी २७६ डाव खेळले होते. रोहित आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११००० धावा करणारा १० वा खेळाडू आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यानंतर ११००० धावा करणारा रोहित चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित आता १० व्या स्थानावर आहे. रोहित नवव्या स्थानावर असलेल्या सौरव गांगुलीपेक्षा फक्त ३६३ धावांनी मागे आहे.

ज्याच्या नावावर ११,३६३ धावा आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेला विराट कोहली हा एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे, तर भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर १८४२६ धावांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे.

भारताने चालू आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली तर २००७ च्या टी२० विश्वचषक, २०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२४ च्या आयसीसी टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला रोहित शर्मा विराट कोहलीसह चार आयसीसी स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू बनेल.

तो कर्णधार म्हणून दोन आयसीसी स्पर्धा जिंकणारा एमएस धोनीनंतर दुसरा भारतीय खेळाडू बनेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT