Rohit-Virat Comeback Dainik Gomantak
देश

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

India vs Australia ODI: टी-20 आणि कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर हे दोघेही आता केवळ वनडेमध्येच आपला जलवा दाखवताना दिसतील.

Manish Jadhav

India vs Australia ODI: भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज फलंदाज आणि करोडो चाहत्यांचे आवडते खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या मैदानातील पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टी-20 आणि कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर हे दोघेही आता केवळ वनडेमध्येच आपला जलवा दाखवताना दिसतील. मात्र, हे दोन्ही फलंदाज पुन्हा कधी मैदानात उतरणार, या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे.

दोन महिन्यांनी होणार पुनरागमन

दरम्यान, विराट आणि रोहित यांना पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत पाहण्यासाठी चाहत्यांना दोन महिन्यांहून अधिक काळ वाट पाहावी लागणार आहे. हे दोघेही ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत (ODI Series) पुनरागमन करतील. या मालिकेची सुरुवात 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे, याच दिवशी चाहते या दोन दिग्गजांना पुन्हा एकदा मैदानात खेळताना पाहू शकतील. या मालिकेचा पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबरला पर्थ येथे खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 23 ऑक्टोबरला ऍडलेड येथे तर मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 25 ऑक्टोबरला सिडनी येथे होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी होता शेवटचा सामना

विराट आणि रोहित यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये खेळला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवून एकतर्फी विजय मिळवला होता.

त्या अंतिम सामन्यात रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅट चांगलीच तळपली होती. त्याने 83 चेंडूंमध्ये 76 धावांची वादळी खेळी खेळून संघाला विजयापर्यंत नेले होते. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले होते. दुसरीकडे, या स्पर्धेत विराट कोहलीनेही आपला फॉर्म कायम राखला होता. त्याने स्पर्धेत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये एकूण 218 धावा केल्या होत्या.

टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आणि विराट आता एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करतील, अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Australia) ही मालिका त्यांच्यासाठी पुनरागमनासाठी एक उत्तम संधी असेल. या मालिकेत चांगली कामगिरी करुन ते भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी आपली तयारी करतील. त्यांच्या पुनरागमनामुळे भारतीय एकदिवसीय संघाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 10 ऑगस्टपासून 'ग्रहण योग' सुरू; 'या' तीन राशींच्या अडचणी वाढणार

Goa Opinion: गोव्यात रिकामी जमीन दिसताच, त्यावर कब्जा करून तेथे नवीन इमले बांधण्याची स्पर्धाच सुरू आहे..

Goa Opinion: 13-14 पिढ्या गोव्यात घालविलेले ‘गोंयकार’ आपल्या जमिनींच्या हक्कासाठी कित्येक दशके कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत..

Cutbona Fishing Jetty: कुटबण जेट्टीवर पुन्हा कॉलराचा उद्रेक; 6 रुग्ण आढळले, एकाची प्रकृती गंभीर

Goa Live News: सेंट जोस डी एरियलजवळ ट्रेनने धडक दिल्याने कोंब मडगाव येथील इसमाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT