Rewa Accident Dainik Gomantak
देश

Rewa Accident: रिवामध्ये भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 14 ठार,तर 40 जण जखमी

या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील रीवा (Rewa) येथे तीन वाहनांच्या धडकेने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 30 वर हा अपघात झाला.  

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा बस जबलपूरहून रिवामार्गे प्रयागराजला जात होती. माहिती मिळताच सोहागी पोलिसांनी घटनास्थळ गाठून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना टुंथर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

सुहागी टेकडीजवळ बस आणि ट्रॉली यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाल्याची माहिती रेवाचे पोलीस अधीक्षक नवनीत भसीन यांनी दिली. ते म्हणाले की, 40 जखमींपैकी 20 जणांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसपीने सांगितले की बस हैदराबादहून निघाली होती आणि ती गोरखपूरला पोहोचणार होती. बसमधील (Bus) सर्व लोक यूपीचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

रीवा एसपीच्या म्हणण्यानुसार, सुहागी टेकडीवरून उतरत असताना एका ट्रॉलीची समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक बसली आणि त्यानंतर बस त्यावर धडकली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नावे उत्तर प्रदेशातील बलरामपूर, गोंडा आणि गोरखपूर येथील आहेत. या अपघातात ट्रकमध्ये मजूर होते, ते जखमी झाले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

SCROLL FOR NEXT