Rishabh Pant - Sunil Gavaskar Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: "अरे उलटी उडी मार आणि सेलिब्रेट कर", पंतच्या शतकावर गावसकर फिदा, सेलिब्रेशनचा दिला सल्ला

Rishabh Pant- Sunil Gavaskar Viral Video: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Sameer Amunekar

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्या डावात दमदार शतक ठोकल्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने पुन्हा एक शतक ठोकत क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला आहे. एकाच कसोटी सामन्यात दोन शतके झळकावणारा तो भारताचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे.

पंतच्या या कामगिरीने संपूर्ण क्रिकेटविश्व भारावून गेले असतानाच, मैदानावर एक मनोरंजक क्षण घडला. पंतचं दुसरं शतक पूर्ण होताच स्टेडियममध्ये उपस्थित भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनी उभं राहत मोठा जल्लोष केला. त्यांनी ऋषभ पंतकडे पाहत उत्साहात "अरे उलटी उडी मार... सेलिब्रेट कर!" असं हसत-हसत ओरडलं. गावसकरांचा हा मजेशीर सल्ला ऐकून स्टेडियममध्ये एकच हशा पिकला.

पंतनेदेखील हात हलवत हसत "नंतर करतो" असा इशारा दिला आणि खेळाकडे लक्ष दिलं. या दोघांमधील हा दिलखुलास संवाद कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ऋषभ पंत आता घराबाहेर खेळताना कोणत्याही देशाविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा जगातील पहिला विकेटकीपर फलंदाज बनला आहे. आजपर्यंत जगातील कोणत्याही विकेटकीपरला कसोटीत अशी कामगिरी करता आलेली नाही.

घराबाहेर खेळताना, आतापर्यंत घरच्या मैदानावर असे फक्त एकदाच घडले आहे. २००१ मध्ये, झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले. त्याने पहिल्या डावात १४२ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने नाबाद १९९ धावा केल्या होत्या.

ऋषभ पंत हा विकेटकीपर म्हणून खेळताना कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. ऋषभ पंतच्या आधी केएल राहुलनेही दुसऱ्या डावात शतक पूर्ण केले. यासह टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. लीड्स कसोटीचा चौथा दिवस सध्या सुरू आहे. सामना अनिर्णित राहू शकतो, पण येथून इंग्लंडच्या अडचणी वाढत आहेत. सामना वाचवण्यासाठी त्यांना कठोर मेहनत घ्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT