wasting water Dainik Gomantak
देश

चंडीगड महानगरपालिकेचा क्रांतिकारी निर्णय! पाण्याचा अपव्यय केल्यास...

पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची घोषणा चंडीगड महानगरपालिकेने केली.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्याच्या (Summer) झळा बसू लागल्यापासून अनेक भागांतून दुष्काळ आणि पाण्याच्या टंचाईच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी एका महानगरपालिकेने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही. पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची घोषणा चंडीगड महानगरपालिकेने केली. या आदेशानुसार जर कुणी पाण्याचा अपव्यय करताना आढळले तर त्याच्यावर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली जाणार आहे. आजपासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. (Revolutionary decision of Chandigarh Municipal Corporation A fine of Rs 5000 will be levied for wasting water)

उन्हाळा वाढल्याने चंडीगडमध्येही पाण्याची टंचाई जाणवून येत आहे. त्यामुळे चंडीगड महानगरपालिकेकडून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत चंडीगडमध्ये आजपासून कुणी पाण्याचा आपव्यय केला तर त्या व्यक्तीवर 5 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

पालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीच्या आणि मोहिमेला यशस्वी करण्यासाठी चंडीगड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली गेली आहे. हे पथक पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. तसेच पाण्याच्या जोडणीला थेट बुस्टर पंप लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच कुणाच्या छतावरील टाकीमधून पाणी ओतताना दिसले तर त्यांच्याविरोधात देखील कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT