Respiratory disease cases in China due to common virus, no possibility of pandemic like Covid, AIIMS Dainik Gomantak
देश

चीनमध्ये श्वसनाच्या आजाराची प्रकरणे सामान्य विषाणूंमुळे, कोविड सारख्या महामारीची शक्यता नाही : AIIMS

Pandemic: आत्तापर्यंत चीनमध्ये पसरणाऱ्या आजाराच्या अहवालात जे विषाणू दिसत आहेत त्यामध्ये कोणतेही नवीन विषाणू नाही," असे डॉ. काबरा म्हणाले.

Ashutosh Masgaunde

Respiratory disease cases in China due to common virus, no possibility of pandemic like Covid, AIIMS:

चीनमध्ये श्वासोच्छवासाच्या आजाराच्या घटना हिवाळ्यातील व्हायरल इन्फेक्शनमुळे वाढत आहेत. त्यामुळे कोविड सारखी दुसरी महामारी होण्याची शक्यता नाही अशी माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS) डॉ. एस. के. काबरा यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, चीनमधून येणाऱ्या अहवालांमध्ये हिवाळ्याच्या हंगामातील सामान्य विषाणू आढळून आले आहेत.

अलिकडच्या काही दिवसांत आठवड्यात उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वासोच्छवासाच्या आजारात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. त्यावरुन जगभारता पुन्हा एकदा कोरोनासारखी महामारी येईल अशी भीती व्यक्त होत आहे.

महामारीची शक्यता नाही

डॉ. एस. के. काबरा यांनी एएनआयला सांगितले की, "चीनमधून येत असलेल्या अहवालांवरून असे दिसून आले आहे की, ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान श्वसनाच्या संसर्गामध्ये अचानक वाढ झाली आहे आणि त्यांनी असे निरीक्षण केले आहे की मुलांमध्ये ते अधिक सामान्य आहे."

"या अहवालांमध्ये मायकोप्लाझ्मा दिसला आहे. त्यांना कोणताही नवीन किंवा असामान्य विषाणू दिसला नाही. हा एक नवीन जीव असल्याचे अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत आणि त्यामुळे कोविड सारखा साथीचा रोग होऊ शकतो की नाही हे सांगणे कठीण आहे. मात्र, महामारी येण्याची शक्यता अजून नाही," असे डॉ. एस. के. काबरा पुढे म्हणाले.

विषाणूचा संसर्ग हिवाळ्यात सामान्य

चीनमधून येणाऱ्या अहवालांमध्ये हिवाळ्याच्या हंगामात आढळणारे सामान्य विषाणू आढळून आले आहेत, असे डॉ. काबरा यांनी सांगितले.

आता तज्ञांनी यावर चर्चा केली आहे आणि त्यांच्या मते, 2-3 गोष्टी असू शकतात ज्यामुळे चीनमध्ये हा आजार वाढला असेल.

पहिले म्हणजे, विषाणूचा संसर्ग हिवाळ्यात अधिक सामान्य आहे आणि मुख्य म्हणजे इन्फ्लूएंझा, एडेनोव्हायरस आणि मायकोप्लाझ्मा. आत्तापर्यंत चीनमध्ये पसरणाऱ्या आजाराच्या अहवालात जे विषाणू दिसत आहेत त्यामध्ये कोणतेही नवीन विषाणू नाही," असे डॉ. काबरा म्हणाले.

स्वच्छता आणि सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन

डॉ. एस. के काबरा यांनी एएनआयशी बोलताना नागरिकांना स्वच्छता पाळण्याचे आणि जास्तीत जास्त सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले.

"एखाद्या मुलाला संसर्ग झाल्यास, तो बरा होईपर्यंत त्याला बाहेर पाठवू नका. साधारणपणे, इन्फ्लूएन्झा एक आठवडा टिकतो. त्यामुळे मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने स्वच्छतेची देखील काळजी घेतली पाहिजे आणि सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे," असे डॉ. काबरा म्हणाले.

डॉ. एस. के काबरा पुढे म्हणाले, साथीच्या रोगाचे व्यवस्थापन कसे केले जाते याबद्दल आम्ही आता पूर्वीपेक्षा जास्त जाणकार आहोत. मंत्रालयाने डॉक्टरांना सांगितले आहे की, अशी प्रकरणे येत आहेत का याची तपासणी करा. जर काही असामान्यता असेल तर पाहिले त्यांना कळवा जेणेकरुन योग्य कारवाई करता येईल.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT