Research: Why drunk people suddenly start speaking in English Dainik Gomantak
देश

Research: म्हणून दारूच्या नशेत लोकं अचानक इंग्रजी बोलायला लागतात

दारू पिल्यानंतर लोकांच्या अंगात काय संचारते हे तर देवच जाणे

दैनिक गोमन्तक

दारू पिल्यानंतर लोकांच्या अंगात काय संचारते हे तर देवच जाणे. तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की दारूच्या नशेत अनेक लोकांची भाषा बदलते. ते त्यांची भाषा सोडून इंग्रजी भाषेत बोलू लागतात किंवा शिविगाळ करतात. तुम्हाला हे देखील माहिती असेल की, दारू प्यायल्यानंतर लोकं नशेत क्रूर कृत्य करू लागतात. किंवा हिंसकही वागतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मद्यपान केल्यानंतर लोकं इंग्रजी बोलू लागतात. आणि पुर्ण शुद्धीत असतांना तेच लोकं इंग्रजी बोलण्यास कचरतात. जेव्हा एखादी व्यक्ती दारूच्या नशेत असते तेव्हा सामान्य माणसांच्या तुलनेत तो संकोच न करता इंग्रजीत बोलू शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की दारूच्या नशेत असताना मानव इतर भाषा शिकण्यास तयार असतो. लिव्हरपूल विद्यापीठ आणि नेदरलँड्समधील मास्ट्रिच विद्यापीठातील एका महाविद्यालयातील संशोधकांनी यावर संशोधन केले आहे.

या संशोधनात हे उघड झाले की अल्कोहोलचे प्रमाण भाषिक प्राविण्य वाढवण्यास मदत करते. डच भाषा शिकणाऱ्या 50 जर्मन लोकांच्या गटाचा या संशोधनात समावेश करण्यात आला. काही लोकांना साधारण पेयातून थोड्या प्रमाणात अल्कोहोल देण्यात आले. तर काही लोकांना फक्त ज्युस प्यायला देण्यात आला.

यानंतर, अल्कोहोलयुक्त पेय प्यायल्यानंतर, जर्मन लोकांच्या एका गटाला नेदरलँडच्या लोकांशी डचमध्ये बोलण्यास सांगितले गेले. त्यातून हे उघड झाले की ज्या लोकांच्या पेयात अल्कोहोल दिले गेले त्यांनी योग्य पद्धतीने डच भाषेतील शब्दोच्चार केले. या व्यतिरिक्त, त्या लोकांमध्ये बोलतांना भाषेच्या वापर करतांना कोणत्याही प्रकारचा संकोच नव्हता.

दारूच्या नशेत ते लोक डचमध्ये स्पष्ट बोलत होते. या व्यतिरिक्त, ज्या लोकांना अल्कोहोल देण्यात आले नाही ते मात्र बोलतांना कचरत होते. त्याही लोकांना थोड्या प्रमाणात अल्कोहोल दिल्यानंतर तेही लोकं काही प्रमाणात डच भाषा निसंकोचपणे बोलू लागले. यावरून असे लक्षात आले की, जरी लोकांना दुसरी भाषा बोलणे अवघड वाटत असले तरी ते दारूच्या नशेत कोणतीही भाषा बोलू शकतात. मात्र अल्कोहोल पिल्याने तुमच्या स्मरणशक्तीवर आणि एकाग्रतेवर खूप वाईट परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT