Research
Research Dainik Gomantak
देश

Indian Men on Internet: भारतीय पुरुष मोबाईलवर पाहतात तरी काय ? रिसर्चमधून समोर आली माहिती; महिलांबाबतही मोठा खुलासा

दैनिक गोमन्तक

Indian Men on Internet: आजकाल सर्वांच्याच जवळ स्मार्टफोन आहेत. मोबाईलचा वापर केवण कॉल करण्यासाठीच नाही तर सोशल मीडियापासून ते व्हिडिओ आणि गेम पाहण्यासाठी केला जातो.

अलिकडेच आलेल्या एका अहवालात स्मार्टफोनबाबत महिला आणि पुरुषांच्या सवयींचे वेगवेगळे मूल्यांकन करण्यात आले आहे. या अभ्यासात स्मार्टफोनशी संबंधित सवयींबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे.

  • महिला आणि पुरुष फोनवर काय करतात ?

संभाषण प्लॅटफॉर्म बॉबल एआयने एका अहवालात म्हटले आहे की भारतातील अनेक पुरुष गेमिंग अॅप्स वापरण्यास प्राधान्य देतात, तर महिला पदार्थ आणि मॅसेजींग अॅप्सवर अधिक वेळ घालवतात.

Bobble AI ने 8.5 दशलक्ष Android स्मार्टफोनचे विश्लेषण करून ही माहिती दिली आहे. भारतीय युजर्सनी गेल्या वर्षी स्मार्टफोनवर 50 टक्क्यापेंक्षा जास्त वेळ घालवला आहे.

10 पैकी फक्त 1 महिला पेमेंट अॅप्सचा करतात वापर

अहवालानुसार केवळ 11.3 टक्के भारतीय महिला पेमेंट अॅप्सचा वापर करतात. त्याच वेळी पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी गेमिंग अॅप्समध्ये फारच कमी आवड आहे.

विश्लेषणातून असे दिसून आले आहे की केवळ 6.1 टक्के महिला गेमिंग अॅप्सचा वापर करतात. भारतीय महिला मॅसेजिंग अॅप्स (23.3 टक्के), व्हिडिओ अॅप्स (21.7 टक्के) आणि फूडशी संबंधित अॅप्स (23.5 टक्के) वर जास्त वेळ घालवतात.

  • 8.5 कोटी युजर्सवर अभ्यास

बुबल एआयने सांगितले की त्यांनी हे संशोधन गोपनीयतेच्या अनुपालनाच्या आधारावर केले आणि 85 दशलक्षाहून अधिक Android स्मार्टफोनचा डेटा वापरला होता.

या अभ्यासासाठी 2022 ते 2023 या कालावधीमधील वापरलेल्या स्मार्टफोनचा आधार घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT