धक्कादायक! हिंदु विद्यार्थिनीवर फेकले बीफ; ब्रिटनच्या शाळांमधील हिंदु विद्यार्थ्यांच्या द्वेषाच्या अनेक घटना उघड

51 टक्के हिंदू पालकांनी अशा घटना घडल्याचे केले कबूल, सर्वेक्षणातील माहिती
Britain School
Britain School Dainik Gomantak
Published on
Updated on

Hindu Students in Britains School: ब्रिटनमधील अनेक शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना वाईट वागणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस खाण्याची सक्ती करणे, मुस्लीम धर्मगुरू आणि भडकाऊ भाषण करणाऱ्या झाकीर नाईकचे व्हिडिओ पाहण्याची सक्ती करणे, असे प्रकार उघड झाले आहेत. ब्रिटनमधील 51 टक्के हिंदू पालकांनी त्यांच्या मुलांबाबत शाळेत असे प्रकार घडल्याचे कबूल केले आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे.

या अहवालात 988 हिंदू पालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यातील 51 टक्के पालकांनी सांगितले की त्यांच्या मुलांना शाळेत भेदभावाचा सामना करावा लागला. त्यातून ब्रिटनमधील शाळांमधील हिंदूविरोधी वर्णद्वेषाचे सत्य समोर आले आहे.

Britain School
Twitter Blue Tick: एलन मस्कची पुन्हा मोठी घोषणा, आजपासून ब्लू टिक...

लंडनस्थित हेन्री जॅक्सन सोसायटीने हा अहवाल तयार केला आहे. शार्लोट लिटलवुड यांनी हा अहवाल लिहिला आहे. अँटि हिंदू हेट इन स्कूल्स असे या अहवालाचे नाव आहे. ही सोसायटी ब्रिटनमधील एक थिंक टँक आहे.

या अहवालातून ब्रिटनमधील काही शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी सांगितली आहे. या अहवालात शाळेतील हिंदू विद्यार्थ्यांना भेदभाव आणि धमकावण्याच्या घटनांवर प्रकाश टाकला आहे.

ब्रिटीश शाळांमध्ये हिंदू मुलांची खिल्ली उडवली जाते कारण ते अनेक देवांची पूजा करतात, असे अहवालात म्हटले आहे. झाकीर नाईकचे व्हिडिओ ऐकण्याची सक्ती केली जाते. हिंदू विद्यार्थ्यांना ब्रिटीश मुले 'पाकी' म्हणतात आणि ब्रिटीश शाळांमध्ये हिंदुविरोधी अपशब्दांचा वापर सामान्य मानला जातो.

भारतातील जातीव्यवस्था आणि समाजकंटकांसाठी हिंदूंना जबाबदार धरले जाते. त्यातून हिंदू विद्यार्थ्यांबातब द्वेषाची भावना इतरांमध्ये पसरली आहे. ब्रिटिश शाळांतील हिंदू मुलांना भारतातील घटनांसाठी पुर्वग्रहातून जबाबदार धरले जात आहे.

अहवालात म्हटले आहे की मुलांच्या पालकांनी ब्रिटिश शाळांवर बरीच टीका केली आहे. ब्रिटीश शाळांमध्ये हिंदू धर्माविषयी अत्यंत कमी ज्ञान दिले जाते. येथे शिकवल्या जाणाऱ्या धार्मिक शिक्षणात हिंदू धर्माची खिल्ली उडवली जाते.

Britain School
India Population Report: चीनला मागे टाकून भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश

भारतात 400 वर्षांहून अधिक काळ ब्रिटीश राजवट असूनही, ब्रिटीश लोकांमध्ये हिंदू धर्माच्या ज्ञानाविषयी अभाव आहे. त्यांना हिंदुंचे देव समजत नाहीत. त्याचा त्रास आमच्या मुलांना होतो. हिंदू मुलांची शाकाहार आणि त्यांच्या धार्मिक पद्धतींवरूनही चेष्टा केली जाते.

एका मुलीवर बीफ फेकल्याचा प्रकारही घडला होता. एका मुस्लीम व्यक्तीने तर हिंदू मुलांना त्यांनी इस्लाम स्वीकारला तर हा त्रास, गुंडगिरी थांबेल, असेही सांगितले होते.

भारतात पंतप्रधान मोदींचा उदय आणि कलम 370 रद्द झाल्यानंतर ब्रिटनमध्ये अनेक मुस्ली मुले हिंदू मुलांना 'तुम्ही आमची मशीद का तोडता, आमच्यावर का हल्ला करता?' असे प्रश्न विचारत असतात. झाकीर नाईकचे व्हिडिओ पाहून धर्मांतर करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात असल्याचे पालकांनी म्हटले आहे.

अशा काही घटनांमधून हिंदू विद्यार्थ्यांसमवेत हिंसाचाराचेही काही प्रकार घडले आहेत, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com