Republic Day 2022 Dainik Gomantak
देश

Republic Day: परेडमुळे आज दिल्लीतील हे मार्ग राहतील बंद

संपूर्ण देश आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 26 जानेवारी हा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.

दैनिक गोमन्तक

संपूर्ण देश आज 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहे. 26 जानेवारी हा भारतासाठी (India) अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण होतो. मात्र, दिल्लीकरांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दिल्ली वाहतूक पोलिसांनी कार्यक्रमादरम्यान लादल्या जाणाऱ्या निर्बंधांबाबत एक सूचना जारी केली आहे. प्रजासत्ताक दिन परेड 2022 चे आयोजन सुलभ करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ही सूचना जारी केली आहे.

सल्लागारानुसार, परेड सकाळी 10.20 वाजता सुरू होईल. ती विजय चौकातून निघून लाल किल्ला मैदानावर जाईल. या मार्गावरील परेड सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी लोकांना कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे. त्याचवेळी जॉईंट सीपी विवेक किशोर यांनी सांगितले की, परेड विजय चौकापासून सुरू होते आणि नॅशनल स्टेडियमच्या गेट क्रमांक अमर जवान ज्योती, इंडिया गेट, प्रिन्सेस प्लेस राऊंडअबाउट, टिळक मार्ग रेडियल रोडकडून डावीकडे, सी-हेक्सागॉन राइट टर्न घेते. आणि लेफ्ट टर्न घेवून एकावर स्टेडियमच्या गेट न. एकवर या परेडचा शेवट होतो.

परेडचा मार्ग सुरळीत पार पडावा यासाठी परेडच्या मार्गाकडे जाणाऱ्या काही रस्त्यांवर वाहतूक प्रतिबंधित करण्यात आले आहे.

राजपथवरील विजय चौक ते इंडिया गेटकडे जाणारा रस्ता काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून परेडपर्यंत बंद राहणार आहे.

काल रात्री 11 वाजल्यापासून रफी मार्ग, जनपथ, मानसिंग रोड येथे परेड संपेपर्यंत राजपथावरील वाहतूक बंद राहणार आहे.

‘सी’-हेक्सागन-इंडिया गेट आज दुपारी 2 वाजल्यापासून (मध्यरात्री) टिळक मार्ग पार होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पहाटे 4 वाजल्यापासून टिळक मार्ग, बीएसझेड मार्ग आणि सुभाष मार्ग या दोन्ही दिशेला वाहतुकीस परवानगी दिली जाणार नाही. परेडच्या हालचालीच्या आधारावरच क्रॉस ट्रॅफिकला परवानगी दिली जाईल.

या रस्त्यांचा वापर करणाऱ्या लोकांना हा सल्ला लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी त्यांच्या सोयीसाठी परेड मार्गावरून प्रवास करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT