Republic Day 2023:  Dainik Gomantak
देश

Republic Day 2023: 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलने शेअर केले खास डूडल

सर्च इंजिन गूगलनं खास डूडल तयार करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Republic Day 2023: आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. देशभरात नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. आज देशातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

प्रजासत्ताक दिननिमित्त गूगलने खास डूडल तयार (Google Doodle) केले आहे. सर्च इंजिन गूगलनं हे डूडल तयार करुन  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गूगलच्या (Google) या खास डूडलमध्ये एक हाताने डिझाइन केलेले पेपरकट आर्टवर्क दिसत आहे. हे आर्ट वर्क गुजरातच्या गेस्ट आर्टिस्टने तयार केले आहे. हे पेपरकट आर्ट तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव पार्थ कोथेकर असे आहे.

पार्थने तयार केलेल्या या पेपरकट आर्टवर्कमध्ये इंडिया गेट, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, सीआरपीएफची मार्चिंग तुकडी यासारखे घटक दिसत आहे. हे गूगल डूडल डिझाइन केल्यानंतर पार्थ कोथेकरने त्याच्या भावना व्यक्त केल्या. 

'जेव्हा तुम्हाला या डूडलवर काम करण्यासाठी संधी तुला मिळाली तेव्हा तुझी रिअॅक्शन कशी होती?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये पार्थला विचारण्यात आला. त्यावर पार्थने उत्तर दिलं, 'माझ्या अंगावर शहारे आले.

मी अनेक वेळा गूगलचा ईमेल वाचला कारण माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मी माझ्या आई आणि बहिणीला याबद्दल माहिती दिली. मला अशी संधी मिळेल असे वाटले नव्हते.'

पुढे पार्थला प्रश्न विचारण्यात आला की, 'लोक तुझ्या डूडलमधून कोणता संदेश घेतील?' या प्रश्नाचं उत्तर देत पार्थ म्हणाला, 'हा पेपर कट पूर्ण होण्यासाठी मला चार दिवस लागले. एका दिवसात मी सहा तास काम करत होतो.

मला भारतातील कॉम्पेक्सिटी, त्यांचे परस्परांशी जोडले पैलू दाखवायचे होते, याची झलक कलाकृतीच्या  कॉम्पेक्सिटीमधून दर्शकांना पहायला मिळेल, अशी मला आशा आहे. '

पार्थनं तयार केलेल्या या आर्टवर्कचा मेकिंग व्हिडीओ (Video) गूगलने त्यांच्या युट्यूब चॅनलवर  शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पार्थ हा गूगलच्या डूडलसाठी आर्टवर्क तयार करताना दिसत आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT