सीईए दाव्यासाठी एक पद्धत सुचवली आहे. जेणेकरून कोणतीही औपचारिक कागदपत्रे न दाखवता रक्कम त्वरीत प्राप्त होईल. Dainik Gomantak
देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मोदी सरकारने केल्या बाल शिक्षण भत्त्यातील अडचणी दूर

भारतीय रेल्वेने विभागाने कर्मचाऱ्यांची ही समस्या Department of Personnel & Training यांच्यासमोर ठेवली. या विभागाने सीईए दाव्यासाठी एक पद्धत सुचवली आहे. जेणेकरून कोणतीही औपचारिक कागदपत्रे न दाखवता रक्कम त्वरीत प्राप्त होईल.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: केंद्र सरकार 7 व्या वेतन आयोगाच्या (Central Government 7th Pay Commission) अंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना बालशिक्षण भत्ता (CEA) देते. परंतु कोविड महामारीमध्ये लॉकडाऊनमुळे देशभरातील शाळा आणि महाविद्यालये (Schools and colleges) बंद आहेत. म्हणूनच सीईए क्लेम (CEA claim) मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. भारतीय रेल्वेने विभागाने कर्मचाऱ्यांची ही समस्या Department of Personnel & Training यांच्यासमोर ठेवली. या विभागाने सीईए दाव्यासाठी एक पद्धत सुचवली आहे. जेणेकरून कोणतीही औपचारिक कागदपत्रे न दाखवता रक्कम त्वरीत प्राप्त होईल.

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, Department of Personnel & Training ने लॉकडाऊन दरम्यान जोपर्यंत शाळा बंद आहेत तो पर्यंत कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एक पर्याय काढला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना सीईए दाव्यासाठी सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागेल. यासह, विनंती केलेल्या दस्तऐवजाची SMS/ Email प्रिंट आउट द्यावी लागेल.

Claim साठीचे पेपर

रेल्वे बोर्डातील उपसंचालक आशुतोष गर्ग यांच्या मते, शाळा बंद झाल्यामुळे मुलांना ना रिपोर्ट कार्ड मिळत आहे ना फीची पावती. कारण फी देखील ऑनलाईन घेतली केली जात आहे. यामुळे सीईएचे क्लेम घेणे कठीण होते. या समस्येवर मात Department of Personnel & Training ने एक पर्याय काढला आहे. जी कागदपत्रे दाव्यासाठी वापरली जातात त्यावर कर्मचाऱ्यांना सेल्फ डिक्लेरेशन देण्यास सांगण्यात आले आहे. यासह, त्यांना रिपोर्ट कार्डची प्रिंट आउट किंवा फी भरल्याचा ईमेल/एसएमएस दाखवावा लागेल. ही सुविधा मार्च 20-2021 च्या सत्रासाठी असेल.

इतका असेल भत्ता

बाल शिक्षण भत्ता दोन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे. दुसरे मुल जुळे असले तरी पहिल्या मुलासह जुळ्या मुलांच्या शिक्षणासाठीही हा भत्ता उपलब्ध असेल. हा भत्ता दरमहा 2250 रुपये आहे. जर तुम्हाला दोन मुले असतील तर महिन्याला 4500 रुपये मिळू शकतात.

कसा लाभ घ्याल

जर मुलाचे आई-बाबा दोघेही सरकारी नोकरीत असतील तर फक्त एकच जण त्यावर दावा करू शकतो. याचा लाभ घेण्यासाठी, शाळेला प्रमाणपत्र द्यावे लागेल जे दाव्याच्या कागद पत्रांसह जोडावे लागेल. प्रमाणपत्रात असे नमूद करावे की, मूल त्या संस्थेचे विद्यार्थी आहे आणि या वर्षी तेथे शिक्षण घेतले. सीईए दाव्यासाठी, कर्मचाऱ्याला मुलाच्या रिपोर्ट कार्डची सेल्‍फ अटेस्‍टेड कॉपी आणि फी भरल्याची पावती देखील जोडावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT